नांदेड जिल्ह्यातील त्या 9 बालकांमध्ये शासनाने जागविला नवा आत्मविश्वास -NNL

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन संवादानंतर जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी सुर्पूद केले मदतीची किट


नांदेड।
 आपल्या माणसाला गमावल्याचे दु:ख हे न सांगता येण्यासारखे असते. कोविडच्या महामारीत ज्या मुलांनी आपले पालक गमावले त्यांना आत्मविश्वासने उभे करण्यासाठी पीएम केअर फॉर चिल्ड्रन हा एक थोटाचा प्रयत्न आहे. या प्रयत्नातून येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी तुम्हाला धैर्य मिळेल. अवघा देश तुमच्या सोबत आहे या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालक गमावलेल्या मुलांच्या मनावर हळूवार फुंकर घालीत नवा आत्मविश्वास दिला.

डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे पंतप्रधानांचा संवाद ऐकता यावा यादृष्टीने तयारी करून 9 बालकांना निमंत्रीत केले होते. यातील 6 बालक हे 18 वर्षे पूर्ण केलेले आहेत तर 3 बालके हे 18 वर्षापेक्षा लहान आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी या मुलांशी संवाद साधत जिल्हा प्रशासन तुमच्या पाठिशी खंबीर असल्याचा धीर दिला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, महिला व बालकल्याण अधिकारी डॉ. अब्दुल रशीद शेख, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे, बालकल्याण समितीचे सदस्य व प्रतिनिधी उपस्थित होते.

पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन योजनेंतर्गत या 9 मुलांना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पंतप्रधानांनी दिलेले प्रमाणपत्र, पीएम केअर्स फॉर चिलड्रन योजनेचे पासबूक, पीएम हेल्थ कार्ड / आयुष्यमान कार्ड याचा समावेश असलेले किट बहाल केले. नांदेड जिल्हा प्रशासनातर्फे संपूर्ण जिल्ह्यातील कोविड-19 मुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या बालकांचा शोध घेऊन त्यातील पात्र ठरलेल्या 9 मुलांना आज नवा आत्मविश्वास दिला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी