नायगाव, दिगंबर मुदखेडे| जन्मापासून एक पाय देवाने हिरावून घेतलेला एक व्यक्ती अतिशय प्रेमळ दयाळू मायाळू माणुसकीचा दुसरं नाव म्हणजे विठ्ठलराव मंगनाळे एक पाय नाही असं सांगायला मला सुद्धा भरून येते. परंतु अशा व्यक्ती बद्दल सांगावं मन भरून हृदय भरून सांगावं असं वाटलं कौतुकाची गोष्ट म्हणजे लोकनायक वंदनिय बच्चुभाऊ कडू यांना अपंग दिव्यांग बांधवाचे दैवत संबोधलं जातं. या दैवताच्या छत्रछायेत घेऊन महाराष्ट्रातील अनेक प्रहार सैनिक रात्रंदिवस दिव्यांगाचे सेवा करत आहेत. त्यांना त्यांचा हक्क मिळवून देत आहे. आणि असाच एक अवलिया प्रहार सैनिक नांदेड जिल्ह्यातील सध्या अहोरात्र जिवाच रान करतो दिव्यांग बांधवांसाठी झटत आहे...राबत आहे.
देवाने परिपूर्ण बनवलं असे कार्यकर्ते रुग्ण सेवा करतात दिव्यांग सेवा करतात यात वेगळं असं काही नाही परंतु स्वतः दिव्यांग असताना दिव्यांगाचा आधार बनुन आपल्या आजूबाजूला अनेक दिव्यांग बांधव त्यांना मिळणाऱ्या सुविधा पासून हक्कापासून वंचित असल्याचे आपण पाहतो परंतु माझ्या प्रत्येक दिव्यांग बांधवाला त्यांचा हक्क मिळाला पाहिजे या एकमेव ध्येयाने पछाडलेला हा अवलिया म्हणजे विठ्ठलराव मंगनाळे साहेब.
गेल्या विस ते बावीस वर्षापासून नांदेड जिल्ह्यात प्रहारचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असताना अनेक प्रहार कार्यकर्ते पाहिले पदाधिकारी पाहिले, त्यात मनापासून काम करणारेही पाहिले आणि फोटोसाठी नावासाठी हपापलेले झपाटलेले अनेक लोक ही पाहिले परंतु ना कोणत्या प्रसिद्धीची हाव ना फोटोसाठी पुढे पुढे धाव ना, नावासाठी कोणता अट्टाहास अशा प्रकारचे वागणे असणार आणि गेल्या दोन वर्षाच्या काळात हजारो दिव्यांग लोकांना यूआयडी काढून देणारा हा माणूस जवळजवळ हजारो लोकांना संजय गांधी निराधार चे प्रकरण करून देऊन त्यांच्या आधार बांधणारा हा माणूस अनेक दिव्यांगांना बीजभांडवल मिळवून देणारा हा माणूस मला एका मसीह पेक्षा कमी वाटत नाही.
देवाने अनेकांना देहाने परिपूर्ण बनवल आहे परंतु देहाने परिपूर्ण असणाऱ्या अनेक अवलादी मेंदूने अपंग असतात परंतु हा देहाने अपूर्ण आसणारा माणूस मेंदू आणि हृदयाने 100% परिपूर्ण आहे अशाप्रकारे जर प्रत्येक प्रहार सैनिकांनी काम केलं तर उद्याच्या येणाऱ्या महाराष्ट्रात लोकनायक वंदनिय बच्चुभाऊ कडू यांना मुख्यमंत्री होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही याची खात्री मी देतो. नांदेड जिल्ह्यातील प्रहार सैनिकांना आणि इतर कार्यकर्त्यांना हे सांगण्याचे कारण एवढंच अनेक जणांना वाटतं मी किती काम करतो मी किती समाजसेवा करतो जर विठ्ठलराव मंगनाळे साहेबांना पाहिलं बघितलं आणि त्याचं काम पाहिलं आपण स्वतः एक पाय नसताना त्यावेळेस अशा मानणाऱ्या लोकांना आत्म परीक्षण करण्याची गरज आहे असं मला वाटतं.
परंतु कोणालाही राग येऊ देऊ नका करण्यासारखं बरंच आहे निवेदन दिलं म्हणजे काम नसतं एखादा आंदोलन केलं म्हणजे काम नसतं तर प्रत्यक्षात एका एका व्यक्तीला आपला कसा उपयोग होईल आणि त्यांच्या मदतीला बच्चुभाऊची सेवा कशी पोहचवता येईल, त्याला आपली कशी मदत होईल हे बघणाऱ्या विठ्ठलराव मंगनाळे सारख्या प्रहार सैनिकाच काम हे मला काम वाटतं व्यक्तिशः वैयक्तिक मी कोणाबद्दल ही बोलत नाही परंतु फोटो हार तुरे नाव बॅनर यासाठी जीवाचा आकांड तांडव करणार्या कार्यकर्त्यांसाठी आणि पदाधिकारी यांसाठी विठ्ठलराव मंगनाळे हे मूर्तिमंत उदाहरण असेल. शेवटी पुन्हा एकदा सरजी तुमच्या कार्याला जिल्हाध्यक्ष म्हणून नव्हे तर प्रहारचा एक कार्यकर्ता म्हणून बच्चू भाऊंचा एक सेवक सैनिक म्हणून सलाम करतो आपल्या सेवेला भविष्यात ईश्वराचे वरदान लाभो ही प्रार्थना करतो.