नाफेडमार्फत हरभरा पिकाच्या ऑनलाईन नोंदणीला मुदतवाढ द्यावी ; खा. हेमंत पाटील यांची कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे मागणी-NNL


नांदेड/हिंगोली।
नाफेड मार्फत हरभरा पिकाची किमान आधारभूत किमतीने खरेदी करण्यात येत होती परंतु २३ मे रोजी मुदतपूर्वच नोंदणीचे ऑनलाईन पोर्टल बंद करण्यात आल्यामुळे हिंगोली लोकसभा मतदारसंघातील हिंगोली, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत . मतदारसंघातील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात हरभरा शिल्लक असून शिल्लक असलेल्या हरभऱ्याची हमीभावाने खरेदी होऊ शकत नाही . त्यामुळे खरेदीसाठी मुदतवाढ देवून खरेदी सुरू ठेवावी अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांची भेट घेऊन केली आहे . केंद्र सरकारने हे   ऑनलाईन नोंदणीचे पोर्टल बंद केले असून याबाबत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची सुद्धा भेट घेणार असल्याचे खासदार हेमंत पाटील म्हणाले.  

हिंगोली लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात हरभरा पिकाचे उत्पादन घेतले जाते रब्बी हंगाम २०२१-२२ मधील हरभरा पिकाची खरेदी करण्यासाठी नाफेड मार्फत हिंगोली, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यात खरेदी केंद्र स्थापन करण्यात आले होते त्यांच्यामार्फत हमीभावाने खरेदी करण्यात आली . ऑनलाईन  नोंदणी करण्यासाठी २९ मे २०२२ पर्यंत पोर्टल सुरु राहणार होते परंतु तत्पूर्वीच म्हणजेच २३ मे २०२२ रोजी ऑनलाईन पोर्टल . केंद्र सरकार कडून बंद करण्यात आल्याने मतदारसंघातील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात हरभरा पीक शिल्लक आहे आणि शिल्लक राहिलेला माल हमीभावाने खरेदी होत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत . 

याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी आज ( दि . २४ मे ) रोजी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मागणी केली आहे   तसेच याबाबत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची सुद्धा भेट घेणार असल्याचे खासदार हेमंत पाटील म्हणाले.   पुढे ते म्हणाले की, शिल्लक राहिलेल्या हरभरा पिकाची खरेदी करण्यासाठी नाफेडच्या खरेदी  केंद्रांना किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणीची करण्याकरिता ऑनलाईन पोर्टलची मुदतवाढ मिळविण्यासाठी राज्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात यावा आणि खरेदी सुरू ठेवावी  अशी मागणी केली आहे .  

यापूर्वी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील ज्वारी मका या भरड धान्याच्या खरेदीकरिता सुद्धा खासदार हेमंत पाटील यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून खरेदी केंद्र ऑनलाईन पोर्टल सुरु करण्याकरिता केलेली मागणी मान्य करून तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिला होता . सदैव शेतकरी हिताच्या दृष्टीने विचार करून खासदार हेमंत पाटील यांनी आजवर अनेक मागण्या मान्य करून घेतल्या आहेत .

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी