हिमायतनगर। तालुक्यातील मौजे धानोरा (ज) येथील श्री कृष्ण मंदीराचा कलशारोहण व मुर्ती स्थापना सोहळा बुधवारी सकाळी बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याचा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन धानोरा ग्रामस्थांनी केले आहे.
हिमायतनगर तालुक्यातील धानोरा ज येथे गेल्या काही वर्षांपासून भव्य श्री कृष्ण मंदीर उभे आहे. या मंदिराच्या कलशारोहण व मुर्ती स्थापने निमित्ताने 18 मे पासून अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करण्यात आले होते. या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये सात दिवस किर्तन सेवा झाली मंगळवारी सकाळी गावातुन कलशाची भव्य मिरवणूक टाळ मृदंगाच्या गजरात काढण्यात आली. दि. 25 मे रोजी बुधवारी सकाळी 10:32 वा. श्री कृष्ण मुर्ती स्थापना व त्यानंतर सकाळी 11:44 वाजता बालयोगी व्यंकट स्वामी महाराज पिंपळगाव यांच्या शुभ हस्ते कलशारोहण करण्यात येणार आहे.
आ. माधवराव पाटील जवळगावकर सपत्नीक उपस्थित राहणार आहेत.श्री.कृष्ण मंदिर देवस्थान कोलंबी येथील श्री गणेराव देवकर व सर्व गोपाळ मंडळी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या अखंड हरिनाम सप्ताहातील काल्याचे किर्तन ह.भ.प.माधवरावजी महाराज बोरगडीकर यांचे दुपारी 12 ते 02 या वेळेत होणार व लगेच सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन धानोरा ग्रामस्थांनी केले आहे. या भक्तीमय कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन धानोरा ग्रामस्थांनी केले आहे.