बुधवारी ग्राम पंचायत विभागाच्या बदल्या
नांदेड। नांदेड जिल्हा परिषदे अंतर्गत कार्यरत विविध संवर्गातील कर्मचा-यांच्या सार्वत्रिक बदली प्रक्रिया समुपदेशनाव्दारे जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत सुरू आहेत. आज मंगळवार दिनांक 24 मे रोजी बदली प्रक्रियाच्या चौथ्या दिवशी शिक्षण विभागाच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
अराजपत्रीत मुख्याध्यापक पदाची प्रशासकीय कारणावरून 1 बदली झाली. केंद्र प्रमुख पदाच्या प्रशासकीय 2 बदल्या झाल्या. शिक्षण विस्तार अधिकारी पदाच्या 8 बदल्या करण्यात आल्या. यात प्रशासकीय 2 तर विनंतीने 6 बदल्या करण्यात आल्या. माध्यमिक शिक्षकांच्या 18 बदल्या करण्यात आल्या. यात प्रशासकीय 5 तर विनंतीवरुन 13 बदल्यांचा समावेश आहे.
बदली प्रक्रियेत यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, ग्राम पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नामदेव केंद्रे, माध्यम शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, उप शिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर, सर्व गट शिक्षणाधिकारी यांची उपस्थिती होती.
आज बुधवार दिनांक 25 मे रोजी ग्राम पंचायत विभातील कर्मचा-यांच्या सकाळी 10 पासून बदली प्रक्रियेला सुरवात होणार आहे. शासन निर्णयाच्या निकषानुसार समुपदेशाने बदली प्रक्रिया पार पाडल्या जात आहेत. जिल्हयातील सर्व तालुक्यात असणा-या जागांच्या समानिकरणानुसार पारदर्शक बदल्या करण्यात येत आहेत.