पतंजली योग समितीच्या व्यसनमुक्ती शोभायात्रेने हिमायतनगर वासीयांना आकर्षित केले -NNL

करा योग रहा निरोगी....व्यसनमुक्त होऊन आपले जीवन निरामयी बनवा  


हिमायतनगर, अनिल मादसवार|
गेल्या ४ दिवसापासून हिमायतनगर (वाढोणा) शहरातील हुजपा महाविद्यालयाच्या प्रांगणात पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान ट्रस्ट, युवा भारत, किसान सेवा समिती आणि परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या पुढाकारातून योग विज्ञान शिबिर सुरु करण्यात आले आहे. या शिबिरात विविध आजारावर मात करणारी आसने व योग प्राणायामचे धडे दिले जात आहेत. शिबिराच्या  चौथ्या दिवशी म्हणजे मंगळवार दि.२४ रोजी सकाळी ७ वाजता शहरातील मुख्य रस्त्याने व्यसनमुक्तीचा संदेश देणारी भव्य रैली काढण्यात आली. या रैलीत महिला व बालकांच्या हातातील विविध प्रकारचे संदेश देणारे फलक शहरातील नागरिकांना आकर्षित करत होते.


हिमायतनगर शहरातील हुतात्मा जयवंतराव महाविद्यालयात योग वर्ग संपल्यानंतर सकाळची ७ वाजता पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी सुरेश लंगडापुरे यांच्या नेतृत्वाखाली ओमशांती केंद्राच्या शीतल दीदी व सिंधू दीदी, गुरुदेव सेवा मंडळाच्या पुढाकारातून टाळ- मृदंगाचा गजर, गुटखा, बिडी, सिगारेट, दारू, मांस -मटण, शहरीरासाठी घातक आहेत. अश्या प्रकारच्या व्यसनापासून स्वतःच्या शरीराला वाचविण्याचा संदेश देणारी भव्य रैली हिमायतनगर (वाढोणा) शहरातील मुख्य रस्त्याने काढण्यात आली. या शोभायात्रेत गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते टाळ मृदंग घेऊन, बालगोपाळ, वयोवृद्धांसह महिला पुरुष हातात भागवा ध्वज व व्यसनाचे दुष्परिणाम  दाखविणारे संदेश फलक घेऊन सहभागी झाले होते. 


रैलीची सुरुवात हुजपा महाविद्यालयांपासून, शहरातील परमेश्वर गल्ली, महात्मा फुले चौक, बाजारणंग चौक, कालिंका, गल्ली, बाजार चौक, गणेश चौक, लाकडोबा चौकातून परत श्री परमेश्वर मंदिरात आल्यानंतर मार्गदर्शन सभा झाली. या ठिकाणी जिल्हा प्रभारी सुरेश लांगडापुरे यांनी उपस्थितांना आजपासून आपल्यातली निर्विकार दूर करत व्यसनापासून मुक्त होण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. यावेळी सर्वानी आई- वडिलांची शपथ घेऊन व्यसनापासून मुक्त होण्याचा निर्धार  केला. यावेळी पतंजली योग समितीचे जिल्हा सहप्रभारी अशोकजी पवार यांनी व्यसनामुळे कुटुंब कसे उध्वस्त होते. याचे जिवंत उदाहरण उपस्थितांना देऊन रैलीतून आपण दुसर्यां संदेश दिला आता या सभेतून व्यसनापासून मुक्त होऊन स्वतःसह कुटुंबाला वाचविण्याचा संकल्प सर्वानी करावा असे आवाहन केले. 


त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी आपल्याला असलेले चहापासून ते सर्व प्रकारचे व्यसन आजपासून सोडून आनंदी जीवन जगण्याची शपथ घेतली. यावेळी मंचावर पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी सुरेश लंगडापुरे, परमेश्वर मंदिराचे संचालक लक्ष्मणराव शक्करगे, वऱ्हाडे सर, संतोष पळशीकर, किरण बिच्चेवार, ओमशांती केंद्राच्या शीतल दीदी, सिंधू दीदी, उषाताई देशपांडे, सुनंदा दासेवार, विठ्ठलराव देशमवाड, गोविंद कदम टेम्भीकर, रामराव पाटील सोनारीकर, मुलचंद पिंचा, पोलीस जमादार अशोक सिंगणवाड, अनिल कुलकर्णी, आदींसह अनेकांची उपस्थिती होती. 



व्यसनमुक्तीची शोभा यात्रा यशस्वी करण्यासाठी रामराव सूर्यवंशी, परमेश्वर इंगळे, मारोती लुम्दे, व्यंकटराव चवरे, गजानन चायल, साहेबराव अष्टकर, अविनाश संगणवार, उदय देशपांडे, प्रभाकर पळशीकर, राजीव पिंचा, बाळूअण्णा चवरे, प्रभु महाराज पिटलेवाड, परमेश्वर मादसवार, संतोष गाजेवार, रामभाऊ सूर्यवंशी, किशोर रायेवार, श्रीनिवास चिद्रावार, नाथा पाटील, अनिल मादसवार, अमोल कोटुरवार, आदींसह योग शिबिरात सहभागी झालेले महिला - पुरुष साधक, बालगोपाल व वाढोणा शहरातील नागरिकांनी परिश्रम घेतले. समारोपापुर्वी योग्य प्रशिक्षकांची सत्कार ओमशांती केंद्राच्या वतीने करण्यात आला.यावेळी व्यसनमुक्तीसाठी कार्य करणारे विठ्ठल देशमवाड, गोविंद कदम, सिंधू दीदी यांनी व्यसनमुक्ती संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले. उपस्थितांचे आभार अक्कलवाड सर म्हणाले कि, भारत देशात सर्वच दुकानात विविध वस्तू विक्रीसाठी ठेवल्या जातात... कोणाला काय..? घ्यायचं.. काय चांगलं... काय वाईट.. ते त्यांनी ठरवायचं असतं.. अश्या या सोने कि चिडिया असलेल्या भारतातही नागरिकांना व्यसनमुक्त व्हा असा संदेश द्यावा लागतो.... हे मोठे दुर्दैव असल्याचं म्हणतं त्यांनी व्यसनमुक्ती शोभा यात्रेला उपस्थित झालेल्या सर्वांचे आभार मानून समारोप करण्यात आला.





Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी