मोफत आहार योजनेचा नांदेड जिल्ह्यात बट्याबोळ द यशोधरा संस्थेने शासनाला कोट्यावधीला गंडविल्याने काळ्या यादीत टाका -NNL

बालाजी पाटील ढोसणे यांनी आरोग्यमंञी राजेश टोपे यांची भेट घेवुन केली निवेदनाद्वारे मागणी


नांदेड। नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब रुंग्णांंना मोफत आरोग्य सुविधा पुरविण्यार्‍या द यशोधरा महिला सेवाभावी संस्था व संबधित अधिकारी यांनी कोट्यावधी रुपयांचा अपहार करुन शासनाला गंडविल्याने द यशोधरा महिला सेवाभावी संस्थेला काळ्या यादीत  टाकुन संबधित संस्थेची व दोषी अधिकार्‍यांची निवृत्त न्यायाधीशा मार्फत चौकशी करण्याची मागणी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील ढोसणे यांनी मुंबई मंञालय येथे आरोग्यमंञी राजेश टोपे यांच्याकडे केली.

सरकारने ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना मोफत आरोग्य सुविधा पुरविण्याबरोबरच रुग्णालयात भरती झाल्यानंतर त्यांना योग्य पौष्टीक आहार मिळावा म्हणुन मोफत आहार योजना आणली या योजनेच्या माध्यमातुन रुग्णांच्या वर्गवरीनुसार त्यांना आहार देण्यात येतो.त्यात हद्यरुग्ण,शस्ञक्रीयेसाठी आलेले रुग्ण,बाळंतपणासाठी आलेल्या स्ञिया,डायलीसीस रुग्ण,आदीनुसार आहारही ठरवुन दिला आहे.शेंगदाण्याचे लाडु,वरण भात,भाजीपोळीसह विविध प्रकारची फळे,अंडी असा आहार देणे वेळ आणी वार यांचे नियोजन करणे आदी बाबी त्यात आहेत.परंतु बर्‍याच रुग्णालयांकडुन रुग्णांना आहार न देता बिले ऊचलल्याने शासनाला फसविण्यात आल्याने द यशोधरा महीला सेवाभावी संस्थेला काळ्या यादीत टाकुन संस्थेची व याला साथ देण्यार्‍या अधिकार्‍यांची निवृत्त न्यायाधिशा मार्फत चौकशी करण्याची मागणी ढोसणे यांनी केली.

संस्थेने शासन नियमाचे ऊल्लघंंन केले असल्याने यात संस्थेने आहार कक्षात सिसिटिव्हि कँमेरे बसविले नाहीत,बर्‍याच ठिकाणी आहार समिती गठीत केलेली नाही,संस्थेचे आहार दर्जाचे असल्याचे प्रमाणपञ नाही(food&Drugs),ञैमासीक वैद्यकीय प्रमाणपञ नाही,बर्‍याच ठिकाणी रुग्णालयात डायट चार्ट ऊपलब्ध दिलेला नाही,डायट चार्ट प्रमाणे आहार ऊपलब्ध करुन देण्यात आलेला नाही,संबधित कंञाटदाराची देयके ऊपजिल्हा रुग्णालय मुखेड,देगलुर, हदगाव व अदिवासी क्षेञातील अंत्यत दुर्गम कुपोषित भागातील किनवट गोकुंदा व ग्रामीण रुग्णालय लोहा,कंधार,माहुर, धर्माबाद, बारड,बिलोली येथील रुग्णांना आहार पुरवठा न करता शासनाने अदा केलेल्या देयकाची चौकशी करण्यात यावी,30 खाटाच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये अंदाजे दिड ते दोन हजार रुग्ण कोणत्या आजाराने दाखल झाले व आंतरुग्णाची चौकशी करण्यात यावी,कोरोना महामारीमध्ये रुग्ण,रुग्णाचे नातेवाईक,व रुग्णालयातील कर्मचारी असे तिहेरी आकडा दाखवुन बिले ऊचलल्याची शक्यता आहे.

 यांची चौकशी केल्यास कोट्यावधी रुपयाचा घोटाळा ऊघडकीस येवु शकतो त्यामुळे बर्‍याच रुग्णालयाची आहार सेवा दिड ते दोन वर्ष बंद असल्याने संबधित संस्थेला काळ्या यादीत टाकुन जिल्ह्यातील संस्थेला कामे द्यावी अशी मागणी राज्याचे आरोग्यमंञी राजेश टोपे यांच्याकडे रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील ढोसणे यांनी मंञालयात भेट घेवुन केली याबाबत आरोग्यमंञ्यानी तात्काळ दखल घेत मा.आयुक्त आरोग्य सेवा मुंबई यांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याचे ढोसणे यांनी सांगीतल्याने कोट्यावधी रुपयाचा नवीन घोटाळा ऊघडकीस येणार असल्याने संबधिताचे धाबे दणादणले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी