अर्धापूर सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी काॅग्रेसचे प्रवीण देशमुख तर व्हाईस चेअरमन पदी रशीद काजी -NNL


अर्धापूर, नीळकंठ मदने|
बहुचर्चित असलेली अर्धापूर सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी अखेर भाऊराव कारखान्याचे संचालक काॅग्रेसचे नगरसेवक प्रतिनिधी प्रवीण देशमुख यांची तर रशीद काजी यांची व्हाईस चेअरमन पदी निवड झाली,हि निवड लक्षवेधी ठरल्याने सर्वाच्या नजरा या निवडीकडे लागल्या होत्या.

अर्धापूर सेवा सोसायटी च्या संचालक मंडळाची निवडणूक नाट्यमय रित्या बिनविरोध झाली होती, अनेक सर्व पक्षीय स्थानिक बडे नेते संचालक मंडळात आहेत, त्यामुळे चेअरमन पदी कोण ? हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला आला, २३ मे सोमवारी निवड करण्यासाठी बैठक घेण्यात आली, यावेळी प्रवीण देशमुख व रमेश मेटकर यांनी तर व्हाईस पदासाठी रशीद काजी व प्रमोद मुळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

छाननीत रमेश मेटकर व प्रमोद मुळे यांचे अर्ज अवैध ठरल्याने प्रवीण देशमुख व रशीद काजी यांची अनुक्रमे चेअरमन व व्हाईस चेअरमन पदी निवड झाली,निर्वाचन अधिकारी म्हणून एस एस जळके व सहकार्य सखाराम पवार यांनी काम पाहिले. यावेळी शहराध्यक्ष राजू शेट्टे, नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, माजी नगराध्यक्ष नासेरखान पठाण,मुसवीर खतीब,गाजी काजी, व्यंकटराव साखरे,सलीम कुरेशी, व्यंकटी राऊत, पंडीत लंगडे, ओमप्रकाश पत्रे, सोनाजी साखरे, शंकरराव वापटकर, पंडीत शेटे यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी