केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी घेतला पापडीचा स्वाद -NNL


लोहा।
मंत्र्यांचा थाटमाट तसा भारी असतो.. अधिकारी...पदाधिकारी .. कार्यकर्ते यांची  धावपळ असते...मंत्री महोदयांना ..कुठे ठेवू..अन कसे करू..यासाठी जीवाचे रान उठवले जाते..पण आयुष्यच संघर्षमय  असलेल्या लढाऊ पँथरने...आपल्या साधेपणाची ओळख राज्याला पुन्हा एकदा करून दिली.पेनूर येथील कार्यक्रम आटोपून नांदेडकडे  निघालेल्या  मंत्री महोदयांनी परतीच्या वाटेवर सोनखेड येथील हॉटेल समोर रोडवर बसून पापड खाल्ले ..त्याच्या या सरळ ...साधेपण स्वभावाची सर्वत्र आदराने  चर्चा झाली...

   
केंद्रीय ..असो की राज्यातील मंत्री त्याचा थातबाट काही औरच असतो...गाडी खाली जरी मंत्री उतरले तरी संबधीत विभागाच्या अधिकाऱ्यांची ..पक्षीय पदाधिकाऱ्यांची तारांबळ उडते...केंद्रीय मंत्री रामदास आठवले मात्र अपवाद ठरतात..एक लढवय्ये पँथर ..अशी त्याची सत्तर ऐंशीच्या दशकात ओळख... आंबेडकरी चळवळीतील  नेतृत्व ..पण सरळ..साधा स्वभाव...आपल्या खास शैलीतून संसदेत ..व जाईल तेथे खास स्टाईलमध्ये त्याच्या कविता सर्वांना भावतात..त्याचे अनेक किस्से सोशल मीडियात ..प्रसिद्ध आहेतकेंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे  नांदेड जिल्हा दौऱ्यावर  आहेत.

शनिवारी (२१ मे) सांयकाळी सात वाजण्याच्या सुमारास पेनूर( ता लोहा) येथिल कार्यक्रम आटोपून मंत्री महोदय नांदेडला परतीच्या वाटेवर होते .त्यांना मधुमेहाचा त्रास .नांदेडमध्ये आणखी एक कार्यक्रम.. त्यामुळे गोळी घेण्यापूर्वी ..त्यांचा  सोनखेड येथील एका हॉटेल समोर  गाड्याचा  कन्व्हा थांबला... रोडलगत खुर्च्या टाकण्यात आला..तेथेच त्यांनी पापड खाल्ले.... थोडा चहा घेतला..आणि आपल्या कार्यक्रमासाठी रवाना झाले सोबत रिपाई राज्यउपाध्यक्ष विजय सोनवणे, सुधाकर सातपुते, अविनाश कांबळे, संतोष मोरे पत्रकार शफी पठाण, माणिक मोरे, विजय धुतराज ,राम मोरे  हे यावेळी उपस्थित होते.केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या या प्रसंगाची सगळीकडे जोरदार चर्चा आहे. सोनखेडकरांच्या साठी हा प्रसंग तसा अविस्मरणीय ठरला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी