अनुदान, बिजभांडवल कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन -NNL


नांदेड|
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्यावतीने मांतग समाज व 12 पोटजातीसाठी अनुदान व बिजभांडवल योजनेचा राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ बँकेमार्फत देण्यासाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षाचे उद्दिष्टे प्राप्त झाले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरजू लाभार्थीनी आवश्यक ती कागदपत्रे घेऊन महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. 

अनुदान योजनेची प्रकल्प मर्यादा ही 50 हजार रुपयापर्यंत असून गुंतवणूक असणाऱ्या रक्कमेत 10 हजार रुपये अनुदान व उर्वरीत बॅंकेचे कर्ज राहणार आहे. बिजभांडवल योजनेच्या निकषात प्रकल्प मर्यादा ही 50 हजार 1 ते 7 लाख रुपयापर्यंत आहे. लाभार्थ्याचा सहभाग 5 टक्के तर महामंडळाचे कर्ज 20 टक्के (10 हजार रुपये अनुदानासह ) तसेच बँकेचे कर्ज 75 टक्के राहिल. या योजनेत स्थिर भागभांडवल निर्मितीच्या उद्योगाचे कर्ज प्रस्ताव जसे वाहन, यंत्रे, मशिनरी खरेदी, इतर विविध व्यवसायासाठी उद्दिष्टे देण्यात आली आहेत.

या दोन्ही योजनेचा लाभ घेण्यासाठी जातीचा दाखला, उत्पनाचे प्रमाणपत्र, दोन छायाचित्र, रेशनकार्ड, आधारकार्ड, व्यवसाय ज्या ठिकाणी करावयाचा आहे त्या जागेचा पुरावा, व्यवसायाचे कोटेशन, अनुभव प्रमाणपत्र, शासकीय योजनेचा लाभ न घेतलेले प्रमाणपत्र व शौचालय बांधल्याचे ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र, प्रकल्प अहवाल, निवडणूक ओळखपत्र, दुकानचा परवाना, लायसन्स, बॅच, परमीट इत्यादी कागदपत्राची आवश्यकता राहील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांची वयोमर्यादा 18 ते 50 वर्षाच्या आत आवश्यक आहे, असेही आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 5.9 मि.मी. पाऊस

जिल्ह्यात शुक्रवार 16 जुलै 2021 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 5.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात दिवसभरात एकुण 211 मिलीमीटर पाऊस झाला आहे. 

जिल्ह्यात शुक्रवार 16 जूलै रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुका निहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 2.2 (251.7), बिलोली- 6.1 (274.2), मुखेड- 7.1 (197.9), कंधार- 4 (201.5), लोहा- 5.5 (203.4), हदगाव- 14.1 (145.8), भोकर- 9.4 (186.7), देगलूर- 6.4 (194.5), किनवट- 7.2 (214.4), मुदखेड- 0.9 (269.8), हिमायतनगर-11.2 (145.2), माहूर-6.7 (154.1), धर्माबाद-0.6 (222.1), उमरी- 2.5 (270.8), अर्धापूर-1.1 (284.6), नायगाव- 3.7 (223) मिलीमीटर आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी