नायगाव। नांदेड जिल्ह्याची गत अनेक वर्षांपासून शैक्षणिक हब म्हणून ओळख निर्माण झाली आहे,यावर्षी अनेक विद्यार्थी मेडिकल साठी पात्र ठरलेले आहे.
यापैकी नायगाव तालुक्यातील मौजे शेळगाव (छ.) येथील सामान्य कुटुंबातील महेश देवीदास आनेराये हा मुलगा मेडिकल(एम.बी.बी.एस) प्रवेशास पात्र ठरला असून त्याला स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण सरकारी मेडीकल कॉलेज अंबाजोगाई जि.बिड येथे प्रवेश निश्चित झाला असल्याचे,त्यांचे वडील देवीदास पा. अनेराये यांनी सांगितले.