आ.संतोष बांगर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारो शिवभक्तांच्या साक्षीने मौजे गिरगाव ता.वसमत येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी
तरुणांनी आमदार संतोष बांगर यांचा आदर्श घेऊन निर्व्यसनी राहिले पाहिजे - ह.भ.प.सोपान महाराज सानप
हिंगोली। शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत मौजे गिरगाव ता.वसमत येथे हजारो शिवभक्तांच्या तसेच माता भगिनींच्या उपस्थितीत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी बोलताना आमदार बांगर म्हणाले की आज आपण जे सन्मानाने जगत आहोत ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपेने म्हणून माझ्या राजाची जयंती ही प्रत्येक जातीधर्माच्या लोकांनी साजरी केली पाहिजे तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली होती. त्यामुळे अशा महान राजाला जातीपातीच्या चौकटीत अडकवून ठेवु नका कारण महापुरुष हे समस्त मानवजातीचे उद्धारक असतात.
यावेळी हजारो शिवभक्तांची उपस्थिती होती,यावेळी मोठ्या प्रमाणात महिला देखील उपस्थित होत्या. यावेळी आमदार बांगर साहेबांच्या भाषणाने व घोषणांनी उपस्थित शिवभक्तांना मध्ये चैतन्य संचारले. यावेळी ह.भ.प. सोपान महाराज सानप यांनी उपस्थितांनी आमदार संतोष बांगर साहेब यांच्या सारखे निर्व्यसनी राहून गळ्यात तुळशीची माळ घातली पाहिजे असे आवाहन केले.
यावेळी जि.प.अध्यक्ष गनाजीराव बेले,माजी जि.प. उपाध्यक्ष उद्धवजी गायकवाड, युवासेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम, उपजिल्हाप्रमुख परमेश्वरराव मांडगे,तालुकाप्रमुख राजुभाऊ चापके, भानुदासराव जाधव,देविदास कर्हाळे, रवी नादरे,सतीश नादरे,सुनील नादरे,भाई पाटील कर्हाळे,गुड्डू नादरे,गुलाब कर्हाळे, रावसाहेब कर्हाळे, विलास रायवाडे, विलास नादरे,माधव डाळपुसे, ज्ञानेश्वर रावळे, नितीन लष्करे,शंकरराव यादव,नितीन होकर्णे, प्रद्युम्न नागरे, व हजारोंच्या संख्येने महिला,पुरुष व शिवभक्त उपस्थित होते.