नविन नांदेड| काळेशवर विष्णुपुरी नांदेड येथील गोदावरी नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्ष युवकांचा पाण्यात बडुन मृत्यू झाल्याची घटना दि.५ रोजी घडली आहे.
या प्रकरणी पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ५ रोजी दुपारच्या सुमारास विष्णुपुरी येथील गोदावरी नदी काळेशवर मंदिर परिसरात लगत असलेल्या गोदावरी नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेला होता. दरम्यान साईनाथ विष्णू इंगळे वय १७ वर्ष रा.पाटील गल्ली कळमनुरी जि.हिगोली हा पोहत असता पाण्यात बडुन मृत्यू पावला.
या प्रकरणी तात्काळ पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी जिवरक्ष दलाच्या साह्याने शोध घेतला. या वेळी नांदेड येथील गाडीपुरा भागातील भोई गल्ली येथील गंगापुत्र जिवरक्षक दलाच्या पथकाने शोघ घेतला असता सायंकाळी मयत तरूणांचा मृतदेह आढळला. या प्रकरणी श्रीकांत गणेशराव काकडे यांच्या फिर्यादी वरून आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार गवळी हे करीत आहेत.