युवा ग्रुप चा वतीने भिम जन्मोत्सव सोहळा निमित्ताने भिम गायीका कडुबाई खरात यांच्या भिम गिताचा कार्यक्रम जिजाऊ सृष्टी येथे २६ एप्रिल रोजी आयोजित केला होता,या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी नांदेड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष पप्पु पाटील कोढेकर,तर ऊधदघाटक म्हणून माजी शिक्षणमंत्री डि.पी.सावंत हे होते.
या सोहळ्याला उपमहापौर विनय पाटील गिरडे, सिडको प्रभारी संतोष पांडागळे , युवक काँग्रेस शहराध्यक्ष विठ्ठल पावडे, रवि पाटील खतगावकर, नगरसेवक विलासदादा धबाले, सुभाष रायबोळे, संदीप सोनकांबळे, श्रीनिवास जाधव, शाम कोकाटे, सिध्दार्थ गायकवाड, सौ.ललिता शिंदे, डॉ.करुणा जमदाडे, विक्की राऊतखेडकर,किशन कल्याणकर,अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष देविदास बस्वदे, माजी विरोधी पक्षनेते जिवन पाटील घोगरे,राजु लांडगे, भि.ना.गायकवाड, विलास गजभारे,यांच्या सह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मान्यवरांच्यी उपस्थिती होती. यावेळी माजी शिक्षणमंत्री डि.पी.सावंत यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हा पुर्ण महिना जयंती निमित्त बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे आचरण करण्याचा असल्याचे सांगून युवा ग्रुप यांनी विविध सामाजिक माध्यमातुन अनेक कार्यक्रम आयोजन करून सामाजिक बांधिलकी जोपसणयाचे काम केले असल्याचे सांगितले.
माजी नगरसेविका डॉ.करूणा जमदाडे यांच्या वतीने साडी चोळी तर पेटंर श्रीरंग खानजोडे यांनी सत्कार केला. प्रास्ताविक पप्पू कोंडेकर यांनी केले तर सूत्र संचालन प्रा.मधुकर गायकवाड यांनी केले. तर ऊपसिथीत मान्यवरांचे स्वागत युवा ग्रुप चे सतिश बस्वदे व पदाधिकारी यांनी केले, यावेळी भिम गायीका कडुबाई खरात यांनी वेगवेगळ्या भिम गिताचा माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण केले, प्रसिद्ध असलेल्या खात्या त्या भाकरीवर बाबासाहेब यांच्ये नाव आहे हे गाणे भिम जल्लोषात साजरे झाले तर अनेक गिते उत्साह व जल्लोष मध्ये संपन्न झाले. या सोहळ्याला सिडको हडको परिसराह ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात महिला व युवक नागरिक ऊपसिथीत होते.