तब्बल १९ वर्षानंतर जुन्या आठवणींना उजाळा
शालेय जीवनात केलेल्या गमतीजमती तसेच दंगामस्ती कोणीच विसरू शकत नाही. कित्येक वर्ष सरुन गेली तरी त्या आठवणी मनात घर करून तस्याच राहतात. त्या आठवणींना उजाळा देऊन एक मेकांची भेट घेण्यासाठी सगरोळी येथील श्री छत्रपती शिवाजी ज्यू कॉलेज चे माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन उत्सव मैत्रीचा कार्यक्रम करण्याचे ठरवून तब्बल १९ वर्षानंतर जुने मित्र मैत्रिणी एकत्र येऊन आपण सध्या काय करत आहोत याचा परिचय देऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. यात खूप हाश्य मैफिल रंगली होती. या कार्यक्रमाचे औचित्य होते सगरोळीची महादेव काठी यात्रा. दि २५ एप्रिल रोजी सगरोळी येथे महादेव काठी यात्रा होती, यात्रे निमित्त सर्व जन यात्रेत यावेत या निमित्ताने दि २४ एप्रिल रोजी कार्याक्रमचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी व्यवसाय मार्गदर्शक असलेले श्री अनिल हनेगावे यांची प्रमुख उपस्थिती होती, तर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ श्री सुधाकर चैनपुरे, डॉ. नागेश तोनसुरे, प्राध्यापक संग्राम पाटील, प्रा. रविंद्र मुपडे, उद्योजक श्री अनिल पाटील, उद्योजक पांडुरंग गायकवाड, उद्योजक श्री सुनील हनेगावे, सहशिक्षक श्री हनमंत मोकलीकर, सहशिक्षक अवरूल लखमाजी तसेच राजू महाजन, सचिन कोटनोड, नागराज मुद्दपवार, नागेश मंगलपवार, संदीप जाधव, विजयकुमार सोनकांबळे, नागेश पवार, गजानन कस्तुरे, बसवंत लोकमवार, रमेश मलशेटवार, रमेश इबिदार, राजेंद्र बोडके, लक्ष्मण भोसले, रोहित मंधरणे, दिपा खिरप्पावार, स्वप्ना शंकरमपेठकर, गोदावरी भोसले, संगीता गरबडे, मीनाक्षी अपराजे, कल्पना गिरगावकर, सरिता मोतीवर, सुनिता मंडळे, अनिता मामडे, गंगामनी चटलोड इत्यादी मित्र मैत्रिणी उपस्थित होते.