स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त सिडको येथील स्वामी समर्थ महाराज केंद्र सिडको येथे आयोजित सप्ताह मध्ये साई सिध्दी प्रतिष्ठान, नांदेड यांच्या वतीने संयोजक दिलीप कंदकुर्ते यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन दि.२७ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता करण्यात आले होते.
यावेळी कंदकुर्ते यांनी सिध्दी प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक ठिकाणी नागरीकांच्या आरोग्य दृष्टीने आरोग्य सदृढ राहावे यासाठी मोफत आरोग्य शिबीर आयोजीत केल्याचे सांगितले. या शिबिरात मध्ये सहभागी असलेल्या डॉ.राहुल कोटलवार, डॉ.समिर कोटलवार, डॉ.प्रतिमा डोणगे पाटील, डॉ.राघवेद्र चालीकवार, डॉ.अशोक बोनगुलवार, डॉ.संतोषकुमार लोंढे, डॉ.शिवानी शेटे, डॉ.शुभागी गायकवाड, डॉ.मोहीत मालपाणी यांनी या आरोग्य शिबीर मध्ये सहभागी झालेल्या रूगनांवर तपासणी करून मोफत औषधोपचार दिले.
या शिबिराचे उद्घाटन तथा संयोजक दिलीप कंदकुर्ते यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ देशमुख, सेवेकरी नवनाथ कांबळे, राजु चौडकर, लखन ,सुजल बचेवार, वैभव ठाकूर,लक्षमण बोरगांवकर,दैशौनतीचे उपसंपादक सुर्यकुमार यन्नावार, नविन नांदेड मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रमेश ठाकूर, छायाचित्रकार सांरग नेरलकर यांच्या सह मान्यवरांच्या उपस्थितीत होती.यावेळी सहभागी असलेल्या तज्ञ डॉकटर यांच्या सत्कार संयोजक व ऊपसिथीत यांच्या वतीने करण्यात आला. यावेळी २७५ जणांची दमा,शुगर,बिपी यांच्या सह विविध आरोग्य विषयक तपासणी करून औषधोपचार देण्यात आले.