सामाजिक कार्य : उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्याच्या हस्ते अमोल सरोदे यांना राज्य पुरस्कार
अर्धापूर, निळकंठ मदने| राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विविध क्षेत्रात सामाजिक कार्य केले जाते. या कार्याची दखल घेवून शासनाच्यावतीने एन. एस. एस. च्या विद्यार्थ्यांचा सत्कार करुन त्यांना पाठबळ आणि ऊर्जा मिळावी यासाठी दरवर्षी पुरस्कार जाहीर केले जातात. सन २०२०-२१ या वर्षासाठीचा राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार अर्धापूरच्या अमोल उद्धवराव सरोदे यांना दि २५ ऐप्रिल सोमवार रोजी दुपारी ३-०० वाजता मुंबईत श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ येथे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पत्रकार उध्दव सरोदे यांचा मुलगा अमोल सरोदे अर्धापूर शहरातील डॉ. आंबेडकर नगर येथील रहिवासी असून अमोलचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले. बारावी यशवंत महाविद्यालयातून तर शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर येथून पदवीपर्यंत शिक्षण घेतले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले. सामान्य कुटुंबातून आलेल्या अमोलने सामाजिक कार्यात यशाला गवसणी घातली.
कार्याचा आढावा : युवा कल्याण व खेल मंत्रालय द्वारा राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून अमोलने रासेयो स्वयंसेवक म्हणून समाजात कार्य केले. शिक्षणाबरोबरच समाजसेवा करत अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमे राबविली. त्यामध्ये स्वच्छ भारत, रक्तदान, वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन, मतदान, पथनाट्य, जल संवर्धन, आरोग्य - नेत्र शिबीर, पर्यावरण, वृक्ष भेट, विविध जनजागृती रॅलीमध्ये सहभाग (एड्स, मतदान, बेटी बचावो बेटी पढावो, स्वच्छता, रक्तदान जागरण मोहिम, पर्यावरण आदी), वनराई बंधारा, शौचालय निर्माण, विविध सर्वेक्षण (कुष्ठरोग निवारण, सिकलसेल सर्वेक्षण), प्लस पोलिओ, गरजुंना कपडे व अन्नदान वाटप, पक्षी संरक्षण संकल्प, पोक्सो ॲक्ट २०१२, लिंगभेद समानता, डिजिटल इंडिया, ग्रीन विलेज, ज्ञानगंगा आपल्या दारी, व्यसनमुक्ती, रस्ता सुरक्षा अभियान, अवयवदान, प्लॅस्टिक मुक्ती, महापुरुषांच्या जयंती कार्यक्रम, कोरोना जनजागृती, आदि विषयांवर रासेयोच्या माध्यमातून कार्य केले.
विशेष म्हणजे ग्राम विकासात योगदान देण्यासाठी ‘गाव तिथे एक तास श्रमदान’ नामक उपक्रम सुरू केला. ज्या ज्या गावात आपण पाऊल ठेवू तिथं समाज प्रबोधन, परिवर्तनासाठी जनजागृती, श्रमदानातून किमान एक तास तरी काम करायचं, असा याचा उद्देश आहे. अशा १४ गावात जागृती केली. राष्ट्रीय, राज्य, विद्यापीठ, स्तरावर प्रतिनिधित्व केले ते खालीलप्रमाणे-
• राष्ट्रीय एकात्मता शिबीर - बॅंगलोर येथे ‘महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व'
• स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड : राष्ट्रीय सेवा योजना विभाग : Advisory Committee Member
• राज्यस्तरीय शिबिर : एक भारत श्रेष्ठ भारत, मुंबई, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण ‘आव्हान’, साहसी क्रीडा (Adventure), ‘प्रेरणा’ नेतृत्व गुण विकास प्रशिक्षण आदि शिबीरांत विद्यापीठाचे प्रतिनिधित्व
• विद्यापीठस्तरीय शिबीरात : स्वच्छता, युवक युवती नेतृत्व विकास प्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा
इतर प्राप्त पुरस्कार :
१. कोव्हीड योध्दा पुरस्कार, महाराष्ट्र शासन
१.२ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा रासेयो उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार २०१७-१७
१.३ संबंध हेल्थ फाउंडेशन, दिल्ली व रासेयो विभाग, उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय यांच्या वतीने आयोजित तंबाखू मुक्त व थूंकीमुक्त भारत अभियानात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल लीडरशीप पुरस्कार २०२० (सन्मानपत्र व सील्वर मेडल)
१.४ स्वामी विवेकानंद राष्ट्रीय युवा पुरस्कार २०२० संस्कृती फाउंडेशन, जळगाव (महाराष्ट्र)
१.५ दैनिक लोकपत्र विशेष सन्मान पुरस्कार २०२० दैनिक लोकपत्र, नांदेड
अमोल सरोदे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव : नुकताच पुरस्कार स्वीकारुन अमोलचे अर्धापूर शहरात आगमन झाले असता ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिशबाजीमध्ये, फुला हारांचा वर्षाव करित स्वागत केले. यावेळी नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, प्राचार्य डॉ. के. के. पाटील, भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत मुळे, जिल्हा सचिव निळकंठराव मदने, पत्रकार सखाराम क्षीरसागर, गुणवंत विरकर, प्रा. डॉ. रघुनाथ शेटे, नगरसेवक सोनाजी सरोदे, नगरसेवक बाबुराव लंगडे, युवक जिल्हा कॉंग्रेस उपाध्यक्ष उमेश सरोदे, कृषी भुषण पुरस्कार प्राप्त राजकुमार मदने,संघरत्न खंदारे पीआरपी जिल्हा उपाध्यक्ष, चर्मकार तालुका अध्यक्ष गजानन जोगदंड, मारोती मुधळे, उध्दव सरोदे, भारत कांबळे, बबन लोखंडे ॲड. गौरव सरोदे, सीआयएसएफ वैभव सरोदे, विक्रांत कांबळे, गौतम ढवळे, प्रकाश कांबळे, संजय ताटे, राहुल सरोदे, रितेश कांबळे, निखिल मोरे, सचिन सरोदे, शुभम सरोदे, कृष्णा सरोदे, भीमा सरोदे, नटु सरोदे, राजू कांबळे, सुरेंद्र सरोदे आदी नागरिक उपस्थित होते.