आपच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पा.कदम पांगरीकर यांची निवड -NNL


नांदेड|
आम आदमी पार्टीच्या नांदेड जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर पाटील कदम पांगरीकर यांची निवड झाल्याचे आम आदमी पार्टीचे प्रदेश सचिव धनंजय शिंदे यांनी पत्र पाठवून कळविले आहे. 

नांदेड जिल्हयामध्ये गेल्या आठ वर्षापासुन आम आदमी पार्टीचे सक्रिय पणे कार्य करत विविध कार्यक्रमात सहभाग घेत शेतकर्‍यासह सर्व सामान्य जनतेच्या विविध प्रश्नांबद्यल आवाज उठवणारे निष्ठावंत कार्यकर्ते ज्ञानेश्वर पाटील कदम पांगरीकर यांच्या कार्याची दखल घेत आम आदमी पार्टी संस्थापक अध्यक्ष दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, प्रदेशाध्यक्ष रंगा राचूरे, प्रदेश सचिव धनंजय शिंदे यांनी नांदेड जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष (संयोजक) पदी निवड करण्यात आली आहे.

निवडीबद्यल आपचे नांदेड जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कदम यांच्या निवडीबद्यल राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य नरेंद्रसिंग ग्रंथी आणि विजय राठोड, इतर पार्टीचे सदस्य फयुम शेख, पाईकराव, अमोल नगनुरवार, शिवाजी काळे, मळगे, अ‍ॅड.रितेष पाडमुख, अवधुत पाटील, दयानंद कदम पाटील, बाबुराव पाटील, संजु जिद्यांल, चरणप्रित सिंग आणि अजित या आदींनी निवडीचे स्वागत केले आहे.

आम आदमी पार्टी वाढविणे प्रयत्न करणार-ज्ञानेश्वर कदम - यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील कदम पांगरीकर म्हणाले की, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील जनसामान्यासाठी केलेल्या कार्याची माहिती जनतेला देऊन नांदेड जिल्हयातील जळागाळातील सर्व सामान्यांना पर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार तसेच पंजाबचे मुख्यमंत्री भागवत मान यांनी शेतकर्‍यासाठी काम केले. शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन जनजागरण करणार व आम आदमी पार्टी वाढविणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील कदम पांगरीकर यांनी बोलतांना दिली आहे.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी