मोहित यांनी सुरू केली काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात फोटोची मालिका
मुबंई। राणा पती पत्नीनी युसुफ लकडवाला यांच्या कडून कर्ज घेतल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला होता . संजय राऊत यांच्यावर भाजपा नेते मोहित कंबोज यांनी पलटवार केला .
संजय राऊत काय बोलतात हे त्यांनाच कळत नाही असं मोहित कंबोज म्हणाले . सलीम जावेदच्या गोष्टी आता संजय राऊत यांनी बंद कराव असा सल्ला त्यांनी दिला . ज्यांना काही कळत नाही त्यांनी राज्यसभेचे एवढे वर्ष खासदार कसे काय होतात हे उद्धव ठाकरे यांनाच माहिती का असा सवाल कंबोज यांनी केला . युसुफ लडकवाला यांच्याकडून राणा पती पत्नींनी हा फ्लॅट विकत घेतला होता. त्यांच खारमधील घर हे युसूफ लकडवाला यांनी उभा केला होता .त्यांनी त्या फ्लॅटचे पैसे युसूफ लडकावाला यांना दिले.
उगाच दोन मिनीटांसाठी खालच्या पातळीवर राजकारण करणारे राऊत यांना सिरीअस्ली घ्यायची गरज नाही असं कंबोज म्हणाले . त्यांचे स्वताचे घोटाळे बाहेर आले प्रॅापर्टी जप्त झाली त्याबद्दल काय बोलणार. युसूफ लकडावालाचे आणि संजय राऊत यांचेही चांगले संबंध आहेत .महाबळेश्वरच्या हॅाटेलवर राऊत अनेकदा जाऊन राहतात असा दावा देखील कंबोज यांनी केला .
अहमद पटेल, संजय राऊत, शरद पवार राजीव गांधी या सगळ्यांचे युसूफ लकडावाला शी चांगले संबंध असल्याचं कंबोज म्हणाले . मातोश्रीवर त्यांच नेहमीच येण जाण त्याबद्दल काय बोलणार असा सवाल त्यांनी केला . संजय राऊत यांना स्वताच्याच विधानवरून माघार घ्यावी लागेल. संजय राऊत हे पवारांची खुर्ची उचलतात तर मग त्यांनी लकडावाला ची खुर्ची उचलली असेल .
EOW ची चौकशी करायची आहे तर करा ना कोण अडवलय तक्रारदार कोण आहेत पण असं कंबोज म्हणाले . मुंबईत माझ्यावर हल्ला झाला किरीटजी वर हल्ला झाला सगळे जण याबद्दल बोलत आहेत पुरावे आहेत तर मग काय...? कारवाई केली संजय पांडेंनी.
भाजप नेत्यांसोबतच्या कारवाईत भेदभाव का असा प्रश्न त्यांनी विचारला. संजय पांडे यांना आता राजकारणाचे वेध लागले आहेत त्यांनी थेट मैदानात याव आम्ही दोन हात करायला तयार असल्याचे ते म्हणाले . माणूस मेल्यावरच गुन्हा दाखल करणार का ? जख्मी किती झालय यावर कारवाई करणार का असा प्रश्न देखील मोहित कंबोज यांनी विचारला ..