लोहा| कृषीच्या क्षेत्रात शाश्वती शेती साठी केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विविध कृषी योजना राबवित असते. काळा सोबत शेतीत आधुनिक तंत्रज्ञान वापरले जात आहे. गट शेती ही अल्प भूधारक असो की सधन शेतकरी यासाठी उपयुक्त आहे. त्या करिता पानी फाउंडेशनच्या माध्यमातून २७ते २९ एप्रिल असे तीन दिवसीय गटशेतीचे प्रशिक्षण कळमनुरी येथे सत्यमेव जयते फार्मर कप अंतर्गत होत आहे. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जल चळवळीच्या प्रनेत्या प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी केले आहे
कळमनुरी ( जि हिंगोली) येथे तीन दिवसाचे गट शेती प्रशिक्षण २७ते२९ एप्रिल या काळात संपन्न होत आहे. पाणी फाउंडेशनच्या पुढाकाराने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. लोहा कंधार तालुक्यात पाणी चळवळी उभी करणाऱ्या प्राणिताताई देवरे चिखलीकर यांच्या हस्ते तहसील कार्यालयात या प्रशिक्षणासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जाणाऱ्या पथकास हिरवा झेंडा प्राणिताताई यांनी दाखवला.
तीन दिवसीय "गट शेती" प्रशिक्षण साठी उगम ग्राम कळमनुरी जिल्हा हिंगोली येथे वडेपुरी,ढाकणी, गुंडेवाडी,मंगरूळ,निळा, शेलगाव,पोलीसवाडी,वाळकी ,कापशी (बु.) येथील शेतकरी मोठ्या संख्येने रवाना झाले. यावेळी माजी सभापती भाजपाचे तालुका अध्यक्ष आनंदराव पाटील शिंदे पाटील लोंढे गजानन मोरे पाणी फाऊंडेशनचे राजाभाऊ कदम , दता वाले माजी सभापती शंकर पाटील ढगे सह प्रशिक्षणाला जाणारे प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.