भारी भीमाच नगर नटलया सार नीळच वादळ उठलंया... वैशाली भैसने-माडे यांच्‍या गीताने नांदेडकर झाले मंत्रमुग्ध -NNL


नांदेड|
हर्षित दिसतेय आकाश सारे, जयंतीत भीम सैनिक सारे, भारी भीमाच नगर नटलया सार नीळच वादळ उठलंया... अशा विविध बहारदार बुध्‍द-भीम गीतांनी महाराष्‍ट्रातील ख्‍यातनाम सिनेगायिका वैशाली भैसने-माडे यांनी नांदेडकरांना मंत्रमुग्ध केले.

नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या क्रांतीसूर्य ज्‍योतिराव फुले व विश्‍वरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अधिकारी-कर्मचारी संयुक्‍त जयंती मंडळाच्‍या वतीने बुधवार दिनांक 27 एप्रिल रोजी नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या प्रांगणात सिनेगायिका वैशाली माडे यांचा बुद्ध-भीमगीतांचा बहारदार कार्यक्रम संपन्‍न झाला.  जिल्‍हा परिषदेच्‍या प्रशासक तथा मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्‍या हस्‍ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्‍यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, डॉ. नामदेव केंद्रे, रेखा काळम-कदम, शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, समजकल्‍याण अधिकारी आर.एच. एडके आदींची मंचावर उपस्थिती होती. प्रारंभी क्रांतीसूर्य जोतिराव फुले व विश्‍वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रतिमांना पुष्‍पहार अर्पण करुन दीप प्रज्‍वलन करण्‍यात आले

याप्रसंगी वैशाली भैसन-माडे यांनी बहारदार रचना सादर केल्‍या. ज्ञानपिपासू युगंधराच्‍या आठवणींना स्‍मरु साजरी भीम जयंती करु...., क ख ग घ म भ न शिकून झाली बाराखडी, भिमाची लेक मी लाखात एक मी शिकाया चालले एबीसीडी...., मन माझं गेलया आनंदुन माझा भिमराज पाहून, हे नानं दिसतंया शोभून बाबासाहेबांच्‍या फोटून, अमृतवाणी ही बुध्‍दाची, पिंगा ग पोरी पिंगा, माझ्या या दलित बांधवांनो..., माझ्या भिमाच्‍या नावाचं कुंकू लावील रमान.., तुम्‍ही खाता त्‍या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं, माझ्या भिमरायावाणी सांगा पुढारी होईल का.... अशा अनेक गितांनी त्‍यांनी रसिकांना मोहित केले. या संचातील राहुल तायडे यांनीही बहारदार गीते सादर केली तर प्रतिक्षा डांगे यांनी सुरेख सुत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला रामेश्‍वर काळे, शुभंम मनके, कुलदीप चावरे, मनिष अत्राम, अभिषेक लोखंडे, विरेंद्र गवंदे व कपिल थारोत यांनी संगीत दिले.

यावेळी किशोर भवरे, आनंद गुंडले, गौतम कांबळे, विलास मुंगे, प्रल्‍हाद लोहेकर, जयंती मंडळाचे अध्यक्ष अशोक कासराळीकर, कार्याध्यक्ष सिद्धार्थ हत्तींबिरे, सचिव बालासाहेब लोणे, कोषाध्यक्ष राजेश जोंधळे, प्रसिद्धी प्रमुख मिलिंद व्यवहारे, गणेश अंबेकर, डॉ. उत्‍तम सोनकांबळे, जिवन कांबळे, अभय नलावडे, नंदलाल लोकडे, बालाजी आवरदे, छाया कांबळे, प्रेमला चौदंते, किर्ती निवळे, इंदुताई वाघमारे, यांच्‍यासह भिमजयंती मंडळाचे पदाधिकारी, जिल्‍हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी आणि जिल्‍हाभरातून हजारो रसिकांची उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी