नांदेड(अनिल मादसवार)शहरात 5 रिस्टर स्केल चा भूकंप होईल,अशी शक्यता नगण्य असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले.त्यामुळे जनतेने घाबरू नये,असे आवाहन केले.22 व 28 नोव्हेंबर रोजी शहरात झालेल्या भूकंपाच्या आवाजावर आज प्रशासनाच्यावतीने पत्रकार परिषदेत खुलासा करण्यात आला.याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी,निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.निशिकांत देशपांडे,तांत्रिक व्यक्ती डॉ.पी.आर.वेसणेकर,प्रा.श्रीनिवास ओंधकर, महानगरपालिकेचे उपायुक्त कंधारे यांची उपस्थिती होती. ..........
भूकंप होण्याची शक्यता नगण्य दक्षता आवश्यक - धीरजकुमार
नृसिंह न्यूज नेटवर्क
0