भोंग्यावरून वाद पेटण्याची शक्यता ,मोहित कंबोज सोलापूर यांचे भोंगे सोलापुरात दाखल -NNL


सोलापूर।
भोंग्यावरून वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली . कारण भाजपा नेते मोहित कंबोज यांनी भोंगे वाटप सुरू केले . मोहित कंबोज यांनी पाठवलेले भोंगे सोलापूर मध्ये दाखल झाले . सोलापुरात पावन मारुती ट्रस्टकडून  भोंगे लावण्यात आले . 

भाजप नेते मोहित कंबोज यांनी सोलापुरातील पावन मारुती मंदिरात भोंगा, एंपलीफायर, वायर, हनुमान चाळीसा असलेले पेन ड्राईव्ह असा सेट पाठवला . सोलापुरातील नाराळे वस्ती जवळील पावन मंदिरावरती भोंगे लावून हनुमान चाळीसा पठाण केला जाणार असल्याचे सांगण्यात आले . 

पावन मारुती मंदिर परिसरातील वड झाडावर 100 मीटर वर हा भोंगा बसवण्यात आला आहे . पावन मारुती मंदिरात रोज दोन वेळा हनुमान चाळीस पठण केले जाणार आहे . पावन मारुती ट्रस्टचे राम जाधव यांनी हे भोंगे मागवले होते.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी