हिमायतनगर| शहरातील परमेश्वर गल्लीतील राहिवशी असलेल्या एका युवा शेतकऱ्याचा विहिरीत पाय घसरुळ पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना दि.२५ एप्रिल रोजीचे दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. मयत युवा शेतकरुयावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंकर करण्यात आले आहे.
हिमायतनगर येथील युवा शेतकरी विनोद शंकर काळे यांचे वडिलोपार्जित शेती शहरानजीक आहे, त्यांचे स्वत:चे शेतीत विहिरी आहे. या विहिरीच्या पाण्यावर शेतकरी शेती करत होता. नित्याप्रमाणे युवा शेतकरी विनोद शंकर काळे, वय ३५ वर्षे, हा शेतीकडे गेला होता. दरम्यान विहरीतील इलेक्ट्रिक मोटार खराब झाल्यामुळे पाहण्यासाठी विहीरीत जात असताना पाय घसरुन पडल्याची घटना दि.२५ एप्रिल रोजी १२ वाजेच्या सुमारास घडली.
हि माहिती मिळताच नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली. ज्या विहिरीत मयत युवा शेतकरी पडलं त्या विहिरीत पाणी व गाळ असल्याने तो गाळामध्ये फसुन मयत झाला. तातडीने काही युवकांनी विहिरीत उतरून मयताचे प्रेत काढले, त्यांच्या पार्थिवावर रात्री ७ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
अशी माहिती मयताचे बंधू परमेश्वर शंकर काळे, वय ४२ वर्षे, व्यवसाय शेती रा. हिमायतनगर यांनी दिल्यावरून हिमायतनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद कलम १७४ सीआरपीसी कायदा प्रमाणे करण्यात आली आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली अशोक सिंगनवाड, मो.नं. ९०४९०७५५२१ हे करीत आहेत. युवा शेतकऱ्याचा अश्या प्रकारे मृत्यू झाल्याने हिमायतनगर शहारत दुःखाचे सावट पसरले आहे. यातून सावरण्यासाठी शेतकरी कुटुंबास मदतीचा हात मिळावा अशी अपेक्षा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
