ब्राह्मण समाज संघटनांची कडक कार्यवाही करण्याची मागणी
नायगाव, दिगंबर मुदखेडे| राष्ट्रवादीचे आ. अमोल मिटकरी नी ब्राम्हण समाज आणि हिंदू धर्माबद्दल काढलेल्या अनुदगाराचा तीव्र निषेध व्यक्त करीत ब्राह्मण समाजाच्या विविध संघटना,व हिंदुत्ववादी सघटनांनी आ. मिटकरी यांच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करीत नायगाव तहसीलदार गजानन शिंदे यांच्याकडे निषेधाचे निवेदन म.रा.कार्याध्यक्ष निखिल भाऊ लातूरकर व बाळासाहेब पांडे ग्रामीण जिल्हाध्यक्ष यांच्या नेत्रत्वा खाली सुपूर्द केले.
सांगलीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत बोलताना आ. अमोल मीटकरी यांनी ब्राह्मण समाजाचे विरुद्ध वक्तव्य करीत इ कन्यादान, हनुमान चालिसा,बद्दल अवमानित शब्द वापरून ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले. मारुती स्तोत्र याबाबत टिंगळटवाळी करणारे वक्तव्य करून हिंदू धर्माच्या धार्मिक भावना दुखावल्या या वक्तव्याने राज्यभर संताप व्यक्त होत आहे.
नांदेड जिल्ह्यात विविध तालुक्यातून विविध ब्राह्मण संघटना आणि हिंदुत्ववादी संघटनांनी सोमवारी निषेध केला आहे. या मध्ये नायगाव तालुक्याच्या तहसील कार्यालयासमोर राज्य कार्याध्यक्ष निखिल लातूरकर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पांडे मांजरमकर,बंडोपंत कुंटुरकर,रमाकांत जोशी,अनिल डोईफोडे, भास्कर शास्त्री महाराज, धनंजय देशमुख,महिला आघाडीच्या प्रीती वडवळकर,भाग्यश्री कुलकर्णी,युवा ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रज्योत कुलकर्णी,तालुकाध्यक्ष राजेश कुलकर्णी उमरी,गंगाप्रसाद दिवानजी नायगाव, यांच्या मार्गदर्शनाखाली आ. मिटकरी यांचा एकत्रितपणे जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला आणि आ. मिटकरींनी माफी मागावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी अशी मागणीही संघटनांच्या या नेत्यांनी केली. तहसीलदार गजानन शिंदे यांना एका शिष्टमंडळाने या संदर्भात भेट घेऊन प्रशासनास कळवण्याचे निवेदन दिले.
यावेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ शाखा नायगाव चे पदाधिकारी, आर्य चाणक्य सेना आणि बहुभाषिक ब्राह्मण महासंघ पुरोहित संघटना,महिला पदाधिकाऱ्यांनी मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी शामल शामराव कुळकर्णी महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष, प्रज्योत प्रदीपराव कुळकर्णी, युवक जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) ता.अध्यक्ष, गंगाप्रसाद कुलकर्णी, शामराव कुलकर्णी, रोहन जोशी ता. युवक अध्यक्ष नायगाव (बा), मंगेश देशपांडे, जिल्हा का. सदस्य,सुधीर जोशी, सागर सुभाषराव पांडे विधानसभा युवक अध्यक्ष नायगाव (बा) ,ऍड. निलेश रमेशराव देशपांडे, सल्लागार, अ. भा. ब्राह्मण म. नायगाव (बा), अविनाश अशोकराव अंजनीकर, ता. सचिव युवक नायगाव (बा) उमेश उत्तमराव नायगावकर,सुनील रमेशराव देशमुख नंदकिशोर म. पाटील आदी उपस्थित होते
