नविन नांदेड| 'खरं आणि खोटं यातील फरक करण्याची अक्कल निर्माण करतं ते शिक्षण,आणि ख-यासाठी संघर्ष करायला शिकवतं ते शिक्षण' अशी शिक्षणाची योग्य आणि समर्पक व्याख्या करणारे, कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली जयंती साजरी करणारे शिवजयंतीचे जनक, भारतातील सामाजिक व शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची १९५ वी जयंती सिडको वाघाळा शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने साजरी करण्यात आली.
सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिडको ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनोद कांचनगिरे हे होते तर व्यासपीठावर देवीदास कदम, संजय कदम,गजानन पाटील कहाळेकर, राजू लांडगे, प्रा.डॉ. रमेश नांदेडकर, माणिक श्रोते, यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नामदेव पदमने, व प्रा.संतोष हापगुंडे यांनी महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला किशनराव रावणगावकर,भुजंग स्वामी, वैजनाथ माने, प्रा.गजानन मोरे, गणेश खंदारे,भगवान जोगदंड,अक्षय मुपडे, संगम कांचनगिरे, सौ.विमलाबाई चित्ते, सौ अनिता गज्जेवार, यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.शशीकांत हाटकर यांनी केले.