नविन नांदेड| महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड आणि जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय व संशोधन केंद्र सिडको नविन नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त "सामाजिक समतेचा जागर सप्ताह" कार्यक्रम दिनांक 6 एप्रिल ते 16 एप्रिल 2022 या कालावधीत महाविद्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
सदरील कार्यक्रम श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी डॉ. नानासाहेब जाधव यांच्या प्रेरणेने आणि डॉ.तेजस माळवतकर व प्राचार्य डॉ. डब्ल्यू आर मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे .या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून दिनांक 11 एप्रिल 2022 रोजी महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त "महात्मा फुले यांचे समाज सुधारणेतील योगदान" या विषयावर महात्मा गांधी अध्यापक महाविद्यालय सिडको येथील प्राचार्य डॉ. सुरेश घुले यांनी उपरोक्त उदगार काढले.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा. डॉ .निरंजन कौर सरदार ह्या होत्या तर प्रमुख उपस्थितीत प्रा. डॉ.मनीषा मांजरमकर प्रा डॉ रावसाहेब दोरवे प्रा डॉ एनजी पाटील हे होते समतेचा जागर विद्यार्थ्यांनी घराघरात पोचवावा महात्मा फुले यांनी 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा काढून महिलांना सन्मान दिला किंबहुना ज्या राष्ट्रात महिलांचा सन्मान केला जात नाही. त्या राष्ट्राची प्रगती होत नाही राष्ट्राला श्रीमंत आणि यशाच्या शिखरावर पोहोचायचे असेल तर महिलांना सन्मान दिला पाहिजे महात्मा फुले यांचे व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे गुरू-शिष्याचे विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आजच्या तरुणांची आहे असे मत डॉ.सुरेश घुले यांनी मांडले.
याप्रसंगी प्रा. डॉ.मनीषा मांजरमकर यांनी महापुरुषाचे विचार स्वतः अंगीकारावे व समाज कार्याच्या माध्यमातून गरजू लोकांना मदत करावी असे आवाहन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.शिवाजी शिंदे यांनी मानले तर आभार प्रदर्शन प्रा .डॉ .दिलीप काठोडे यांनी केले सदरील कार्यक्रमात डॉ.अशोक वलेकर, डॉ. मेघराज कपूर, डॉ विद्याधर रेड्डी, डॉ प्रतिभा लोखंडे, डॉ .सत्त्वशीला वरघंटे ,प्रा.सुनील राठोड, श्री बीजे गुंडे आदींची उपस्थिती होती. सदरील कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.