गटशेतीतून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी उपयुक्त - प्रणिताताई देवरे - चिखलीकर -NNL


नांदेड,अनिल मादसवार| 
कृषी क्षेत्रात नवे नवे प्रयोग प्रयोग केले जात आहे. यांत्रिकारण मोठ्या प्रमाणात होत असतानाच  मजुरदार शेतात कामासाठी मिळत नाहीत असा काळात गटशेती हा शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे गटशेती काळाची गरज आहे असे प्रतिपादन जल चळवळीच्या प्रनेत्या व भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा  प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी केले आहे. 

गेल्या पाच वर्षा पासून प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी सत्यमेव जयतेच्या माध्यमातून पाणी चळवळ लोक चळवळ करण्यात त्यांना यश येताना दिसते आहे. पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून सत्यमेव जयते फार्मर कप तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर कळमनुरी येथे पार पडले. या शिबिराच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. प्रणिताताई देवरे चिखलीकर स्वतःला तीन दिवस या प्रशिक्षणासाठी उपस्थित राहिल्या. त्यापुढे बोलताना म्हणाल्या  शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतीमध्ये येणाऱ्या समस्या एकट्याने न सोडविता शेतकऱ्यांनी गटा गटांनी एकत्र येऊन त्या समस्या सोडवाव्यात  तसेच बाजारात जे विकेल तेच पिकेल याचा अवलंब केला पाहिजे

गटशेतीच्या माध्यमातून उत्पादन वाढ , पिक किड व्यवस्थापन, शेतीमालाची गुणवत्ता सुधारणे, उत्पादन खर्च कमी करून अधिक उत्पन्न मिळविणे शेतीची सर्व कामे एकत्रित येऊनच केली जाऊ शकतात यासाठी सत्यमेव जयते फार्मर कप पाणी फाउंडेशन ने आयोजित केला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून गटाने शेती करणे गटागटात चुरस निर्माण करणे व गटाच्या माध्यमातून शेतीत येणाऱ्या समस्या सोडवणे हा या स्पर्धे मागील उद्देश असल्याचे सांगितले. या स्पर्धेत एका गटामध्ये किमान वीस शेतकरी कुटुंब व 25 एकर जमीनक्षेत्र असणे गरजेचे आहे. गट शेतीस प्रोत्साहन म्हणून पाणी फाउंडेशन च्या वतीने राज्यस्तरीय पहिले बक्षीस 25 लाख रुपये, दुसरे बक्षीस 15 लाख रुपये आणि तिसरे बक्षीस दहा लाख रुपये असे ठेवण्यात आले आहे

तालुकास्तरावर तालुक्यातील पहिल्या येणाऱ्या गटाला एक लाख रुपये बक्षीस दिले जाणार आहे. यासाठी मूल्यांकन पद्धत वापरली जाणार आहे. स्पर्धेस नियम व अटी लागू असणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या उज्जवल आणि समृद्ध भविष्यासाठी गट शेतीचा वापर करावा. अलीकडच्या काळात विभक्त कुटुंब पद्धतीमुळे शेतात काम करणाऱ्या कष्टकऱ्यांची आणि शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. असा काळात गटशेती हा उत्तम व उपयुक्त पर्याय ठरणार आहे असे मार्गदर्शन प्रणिताताई देवरे यांनी केले.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी