लोहा| आंबेडकरी जनतेच्या हक्कासाठी अनेकांनी सामाजिक चळवळीत स्वतःला वाहून घेतले. एका पिढीलाच समृद्ध वारसा दुसऱ्या पिढीच्या नेतृत्वाने पुढे चालविला हे करताना कधीच स्वतःचा कुटुंबाचा विचार केला नाही म्हणून आज ही ताकद आपणास दिसते आहे. पण या इतिहासाची आठवण नव्या पिढीला आहे का? आणि म्हणूनच सामाजिक व्यवस्था दिशाहीन होते आहे येणाऱ्या काळात अनेक संकट आपल्या समोर असतील असे प्रतिपादन जिल्ह्यातील आबेडकरी चळवळीचे खंबीर नेतृत्व सुरेशदादा गायकवाड यांनी केले
हरसद येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ नेते सुरेश दादा गायकवाड हे होते यांच्या हस्ते निळ्या ध्वजाचे तर पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण लोह्याचे माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर सोनखेड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भोसले स पोलीस उप निरीक्षक परिहार, उपसरपंच संजय भालेराव , माजी नगरसेवक नामदेव फुलपगार अनिल बेळीकर गौतम वाघमार माळेगाव सोनखेड पोलिस स्टेशनचे कॉन्स्टेबल श्री काळे श्री बोरगावे श्री चित्ते श्री वाघमारे शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष शंकर पाटील ठाणेकर युवक काँग्रेसचे महासचिव सुदर्शन शेवाळे युवासेनेचे उपतालुका प्रमुख नटराज पाटील ठाणेकर व भीम जयंती मंडळ अध्यक्ष व माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड यांची उपस्थिती होती.
नामदेव फुलपगार अनिल बेळीकर APi भोसले साहेब यांची भाषणे झाली प्रस्ताविक जयंती मंडळाचे अध्यक्ष व लोहा पंचायत समितीचे माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड यांनी केले सूत्रसंचालन साहेब बाबाराव गायकवाड यांनी केले तर आभार संजय भालेराव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील रितेश भालेराव चेतन भालेराव राष्ट्रपाल भालेराव सतीश भालेराव दिलीप भालेराव चंद्रकांत भालेराव भालेराव रजनीकांत भालेराव राजू भालेराव भालेराव धमक किरण शंकर सुनील संतोष रविकांत संदीप सुनील भालेराव, साहेब माधव सोपान निलेश पवार देवबा रामकिसन सुदर्शन नामपले यांनी परिश्रम घेतले.
दुपारी चार वाजता गावातील प्रमुख रस्त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र ची भव्य मिरवणूक निघाली. यावेळी उपासक-उपासिका भीमसैनिक व बाहेरगावाहून आलेले निमंत्रित पाहुणे मंडळी होती. सुरेशदादा यांचे भाषण ऐकण्यासाठी परिसरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.