नांदेड| जागतिक पुस्तक दिनानिमित्त एक दिवस अगोदर यशवंत महाविद्यालय, नांदेड येथील हिंदी विभागातील विद्यार्थी लेखकांनी लिहिलेल्या कवितांवर आधारित "काला की उडान" भित्तीपत्रकाचा उद्घाटन सोहळा प्राचार्य गणेशचंद्र शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. लोकार्पण प्रसंगी विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या कवितांवर आपले मत मांडले आणि कलेचे महत्त्व विशद करताना ते म्हणाले, कला म्हणजे असे उपक्रम, ज्यासाठी कौशल्याची आवश्यकता असते.
भित्तीपत्रक डॉ.सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली होते. या कार्यक्रमाला हिंदी विभागाचे डॉ.विजयसिंह ठाकूर, डॉ.ज्योती मुंगल आदी उपस्थित होते. भित्तीपत्रकातील विषयात शिक्षण, महिला, कोरोना, विविध समस्या, वर्तमान जगाचे वास्तव, सोशल मीडियाशी निगडित विद्यार्थ्यांचे जीवन, मनातील भावना, निसर्ग चित्रण, प्रेम, शाळा, जीवन संघर्ष, माणसाचे नशीब, शक्ती इत्यादी चा समावेश आहे. या विषयांवर आधारित विद्यार्थी कवींनी मनातील भावना आणि विचार यांची मूळ अभिव्यक्ती केली आहे.
भित्तीपत्रकाचे संपादक मंडळ खालीलप्रमाणे होते. संपादक- कु.मनीषा चक्रधर, एम. जुबेर, उपसंपादक- कु. कोमल चव्हाण, कु. राणी माटे, कु. पूनम इंगोले, योगेश कलंदर, सदस्य- हरीकर पांडुरंग, नेहा मुनेश्वर, शिवानी भांगे, पायल वरकड, अनुदीप गुरम.