नविन नांदेड। इंदिरा इंटरनॅशनल पब्लिक स्कूल, विष्णुपुरी, नांदेड या नामांकित शाळेतील इ. १०वी बोर्डाच्या नुकत्याच परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना पुढे काय... ? या विषयी करियर विषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
तुम्ही 10 वी पास झाल्यावर तुमच्या समोर , दहावी नंतर काय करावे? दहावी नंतर कोणते शिक्षण घ्यावे? आणि दहावी नंतर चे कोर्स कोणते योग्य असतील? असे भरपूर भेडसावणारे प्रश्न निर्माण होतात? दहावी ही आपल्या पुढच्या करीयरची आणि शिक्षणाची महत्वाची आणि पहिली पायरी आहे. दहावी नंतर शिक्षणाची निवड करताना योग्य करा . त्यासाठी आपल्या गुरुवर्यांचे मार्गदशन घ्या.
उच्च शिक्षित व्यक्तींचे मार्गदर्शन घ्या. मेडिकल व इंजिनिअरिंग क्षेत्रात ज्या विद्यार्थाना करियर करण्यासाठी खूप मोठ्या नामी संधी उपलब्ध असल्याचे प्राध्यापक संगेवार यांनी सांगितले. त्यासाठी विद्यार्थ्यानी कुठली तयारी करावी? कोणते क्षेत्र निवडावे यांची माहिती दिली व यथायोग्य मार्गदर्शन केले. तसेच सहयोग सेवाभावी संस्थेचे सचिव डॉ. संतुकराव हंबर्डे यांनी विद्यार्थ्याना ''उच्च शिक्षण घ्या...आईवडीलाचे नाव मोठे करा'' असा मोलाचा सल्ला दिला व पुढील भावी वाटचालीस विद्यार्थ्यांना शुभेच्या दिल्या.