मुखेड, रणजित जामखेडकर। आदिवासी कोळी महादेव, कोळी मल्हार सजाच संघटनेच्या वतीने दि. ४ एप्रिल २०२२ रोजी मुखेड- कंधार मतदार संघाचे आमदार डॉ. तुषार राठोड यांच्या कार्यालयावर शेकडो समाज बांधवांच्या उपस्थितीत ढोल बजाव आंदोलन धडकले. या आंदोलनास तालुक्यातील विविध भागातील समाज बांधव व महिला शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.
आदिवासी कोळी महादेव, कोळी मल्हार व मन्नेरवारलू समाजास खावटी अनुदान योजना मिळणे,मुखेड- कंधार चे उपविभागीय अधिकारी जात प्रमाणपत्रासाठी अडवणूक करीत असुन त्यांच्या सोबत समाजाची बैठक लावून प्रमाणपत्र वितरीत करणे, विद्यार्थ्यांना सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गंत विद्यार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करणे, शबरी घरकुल आवास योजना मतदार संघात प्रभावीपणे राबविणे अशा इतर मागण्या घेऊन संबंध जिल्हयातील समाज बांधव हजारोंंच्या संख्येने या ढोल बजाव आंदोलनात सहभागी होऊन आमदार डॉ.राठोड यांच्या कार्यालयावर धडकले.
ढोल बजाव आंदोलन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासुन ते बसस्थानक, लोखंडे चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक,नरसी रोड व आ.डॉ. राठोड यांच्या कार्यालयावर धडकले. यावेळी मारोती मामा मामीलवाड, आनंदा रेजीतवाड,शिवाजी गेडेवाड, संजय यलमवाड,संदिप पिल्लेवाड, साईनाथ बोईनवाड, रामचंद्र भामटे, माधव पुनवाड, शोभा गव्हाणे, मथुराबाई पुठेवाड यांनी मनोगत व्यक्त केले व आ.डॉ. राठोड या ढोल बजाव आंदोलक समाज बांधवांच्या मागण्यांचे निवेदन आ. डॉ. राठोड यांच्या वतीने भाजप तालुकाध्यक्ष डॉ.विरभद्र हिमगिरे यांच्या सह भाजपाच्या शिष्टमंडळाने स्विकारले.
यावेळी भारत गव्हाणकर, सुधीर यरपुरवाड, व्यंकट यरमुलवाड, सचिन मंदेवाड, गणेश डोरनाळे, सुधाकर नागरवाड,बालाजी दिवटे,प्रल्हाद नाईकवाडे,माणिक पुटवाड, सचिन गिरेवाड, सचिन श्रीरंगवाड, जेजेराव दुधवाड,संभाजी गडमवाड, दिगांबर उलगुलवाड,विलास तोटावाड,बालाजी बाहाळे,बाबुराव कामजे, बालाजी मंगेवाड, माधव बिल्लेवाड,चंद्रकांत लोकुलवाड, व्यंकट आंपलवाड,नामदेव रेजीतवाड, लालबा पिल्लेवाड, गोपाळ झिंकवाड, प्रकाश झिंकवाड, मारोती दारसेवाड,प्रमेश्वर मांगेवाड,माधव चिकटवाड,संजय यंबारे,वाल्मिक कामजे,माधव फिरंगवाड,हाणमंत गजलवाड, अपर्णा पिल्लेवाड, कल्पना नालापल्ले, लक्ष्मीबाई डोरनाळे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते.