नांदेड| शहरातील सुप्रसिद्ध उद्योजक माझे जीवलग मित्र संजय बियाणी यांच्या घरासमोर दिवसाढवळ्या गोळीबार करुन त्यांची निघृणपणे हत्या झाल्याचे वृत्त सकाळी मला दिल्लीत समजताच धक्का बसला.
शहरातील कांही व्यापारी, डॉक्टर, राजकीय पुढाऱ्यांच्या जीवितास धोका असल्याची माहिती पोलिसांकडे असतानाही बियाणी यांची निघृण हत्या म्हणजे बिहारलाही लाजवेल असे हत्याकांड नांदेडला घडले त्यावरुन नांदेडमध्ये पोलिस राज सुरु असलेल्याची प्रचिती या घटनेवरुन दिसून येते.
यापूर्वीही माझ्या मित्रमंडळातील कांही जणांवर प्राणघातक हल्ला झाला होता. नांदेडमध्ये सुरु असलेल्या गुंडाराजमुळे मी माझ्या जीवलग मित्राला गमवलो असल्याची प्रतिक्रिया भाजपा नांदेडचे का.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केली. याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी खा.चिखलीकर यांनी केली.