स्थायी सभापती किशोर स्वामी यांचा कडून सिडको परिसरातील कामाची पाहणी..NNL


नविन नांदेड|
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने सिडको परिसरात १४ कोटी ७६ लाख रुपयांच्या विकासात्मक कामाचे भूमिपूजन पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते झाल्या नंतर दुसऱ्या दिवशी या कामांना सुरुवात झाली व  या कामाची पाहणी मनपा स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी यांनी सिडको येथे केली,या वेळी ही कामे दर्जेदार होण्याचा सुचना संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्या.

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने सिडको परिसरात सिमेंट काक्रेट व डांबरीकरण विकासात्मक कामाचे भूमिपूजन पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण व दक्षिण आमदार मोहनराव हंबर्डे, मनपा पदाधिकारी यांच्या ऊपसिथीत झाल्या नंतर दुसऱ्या दिवशी या कामाला सुरुवात झाली.

२ एप्रिल रोजी सिडको परिसरातील उस्माननर ते दर्डा किराणा सिमेंट काक्रेट रस्त्याचा कामाची पाहणी सभापती किशोर स्वामी यांनी केली या वेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दर्जेदार कामा बाबत सुचना केल्या.यावेळी मनपा अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, कनिष्ठ अभियंता किरण सुर्यवंशी, गुतेदार फौजी ,प्रविण नंदलाल,व माजी नगरसेवक संजय मोरे यांच्या सह परिसरातील नागरीक ऊपसिथीत होते.



 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी