आमदार चषक टेनिस बाल किक्रेट स्पर्धत क्लासिक क्रिकेट संघ प्रथम..NNL


नविन नांदेड|
क्लासिक स्पोर्ट्स अणड हेल्थ केअर अकडमी चा वतीने आमदार चषक टेनिस बाल किक्रेट खुले सामान्यांचा स्पर्धेत क्लासिक क्रिकेट  हा संघ प्रथम आला आहे, विजयी स्पर्धकांना आ.अमर राजुरकर,आ.मोहनराव हंबर्डे व मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीसे आमदार हंबर्डे यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे २ एप्रिल रोजी करण्यात आले.

 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे व मान्यवरांच्या हस्ते सिडको येथील इंदिरा गांधी मुलींची प्राथमिक शाळा सिडको येथील मैदानावर २० फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते,या स्पर्धेत एकुण ६४ संघांनी सहभाग घेतला होता. आमदार चषक क्रिकेट टेनिस बॉल चे आयोजन क्लासिक स्पोर्ट्स  व हेल्थ केअर अकडमी चा वतीने आमदार चषक सामने आयोजीत करण्यात आले होते.

या स्पर्धेत प्रथम पारितोषिक क्लासिक क्रिकेट कर्णधार सचिन पुंड क्लब ५५ हजार५५५ ,दुसरे पाली क्रिकेट क्लब कर्णधार रवि साळवे २२,२२२,तिसरे  एकता क्रिकेट क्लब कर्णधार यादव खंडागळे अकरा हजार एकशे अकरा व मन आफ द सिरीज  सतिश पुंड, बेस्टबालर हनुमान सिंह ठाकुर ,बेस्ट किपर दिपक दोंतेवार,बेस्ट बटमन आशिष मोरे  अशी विविध पारितोषिके देण्यात आली, या स्पर्धेचे बक्षीस वितरण आ.अमर राजुरकर, आ. मोहनराव हंबर्डे ,व पक्षप्रभारी संतोष पांडांगळे, माजी उपमहापौर शमीम अब्दुल,वाघाळा शहर ब्लाक काँग्रेस कमिटीच्ये अध्यक्ष विनोद कांचनगिरे , नगरसेवक डिम्पल नवाब, हफीज भाई, मारोती शंखतिर्थकरथकर,संदीप कदम यांच्या सह मान्यवरांच्या उपस्थितीत होती.

सुत्रसंचलन राजु लांडगे,तर आभार प्रदर्शन अल्पसंख्याक दक्षिण अध्यक्ष शेख अस्लम यांनी केले. शेख अशफाक,गौतम भालेराव, बालाजी माने, सचिन मगर,रोहीत रेवणवार, मोहम्मद माज,शेख सोकद,शेख फेरोज, अजय गालेवाड,सचिन जिलहेवाड,मोहीत बेदी,श्रीकांत कांबळे,मंहमद शकील.महमद सुनिल,मंहमद अखतर ,रोशन जोगंदड, ऋषी शिंदे, विशाल बरलेवाड,यांच्या सह संयोजन समितीने परिश्रम घेतले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी