‘तुम्ही थोडं ऐडजेस्ट केलं तर अजून चांगलं चालेल’ अशोक चव्हाणांची फडणवीसांना विनंती -NNL

नांदेड मध्ये मंत्री अशोक चव्हाण आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर  


नांदेड|
देवेंद्रजी...आमच्या महाविकास आघाडी सरकारचा काम चागलं चाललं आहे. तुम्ही थोडं ऐडजेस्ट केलं तर अजून चांगलं काम चालेल असं म्हणत काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना साकडे घालत एकप्रकारे 
विनंती केली. 

राज्यात महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला असताना नांदेडमध्ये आज महाविकास आघाडी सरकारचे मंत्री अशोक चव्हाण आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस नायगाव तालुक्यातील कुंटुर येथे दिवंगत नेते गंगाधरराव कुंटुरकर यांच्या स्मारकाचे लोकार्पण आणि स्मृतीग्रंथाचे प्रकाशन सोहळ्यानिमित्ताने एकाच व्यासपीठावर आले. यावेळी दोन्ही नेत्यांनी जोरदार भाषण करत एकमेकांना कोपरखळी लगावली.

‘तुम्ही एकत्र येणार का असे अनेकांचे प्रश्न होते. पण मीडियाचा भ्रमनिराश झाला देवेंद्रजी. त्यांना वाटलं आपण एकत्र व्यासपीठावर येतो की नाही की, आजच्या समारंभाप्रमाणे राज्याचं राजकारण व्हावं. अनेक वर्षानंतर सगळ्या पक्षाचे नेते एकत्रित आले’ असं अशोक चव्हाण म्हणाले. देवेंद्रजी, आमच्या महाविकास आघाडीचं काम चागलं चाललंय. तीन वर्ष आता सरकारला पूर्ण होती. तुम्ही थोडं अडजेस्ट केलं तर अजून चांगलं काम चालेल’ असं म्हणत चव्हाण यांनी फडणवीसांना विनंती वजा कोपरखळी लगावली.


देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी देशाचं वातावरण बदलण्याची गरज आहे. दोन्हीकडून अर्थात सत्ताधारी आणि विरोधकांच्या बाजूने वातावरण बदलण्याची गरज आहे.  मी आणि देवेन्द्रजी शेजारी आहोत, आम्ही रोज बोलतो. राज्यात जो पॉलिटिकल वॉर ( war ) चालला तो गँगवार होऊ देऊ नका. दोन्हीकडून होऊ नये याची काळजी घेण्याची गरज आहे. भाजपा आणि महाविकास आघाडीने देखील स्तर सांभाळला पाहिजे, असंही चव्हाण म्हणाले.

विशेष म्हणजे,  याच कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन केलं.  या कार्यक्रमाला जातांना अशोक चव्हाण तब्बल 400 गाड्याचा ताफा घेऊन कार्यक्रमस्थळी आपल्या हजारो समर्थकासह पोहोचले होते. दरम्यान, पत्रकारांशी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.

राज ठाकरे हे योग्यच बोलले होते. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला. शिवसेनेच्या सुद्धा चांगल्या जागा आल्या होत्या. पण सत्तास्थापन करत असताना शिवसेनेनं पाठीत खंजीर खुपसला आणि तीन पक्ष एकत्र येऊन कपटाने सरकार स्थापन केलं, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी