गोदावरी अर्बनच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांना बेस्ट चेअरमन आवर्ड -NNL

नांदेड/हिंगोली/यवतमाळ। महाराष्ट्र राज्य फेडरेशनच्या वतीने सहकार क्षेत्रात विविध पदावर आपल्या कार्य कर्तृत्वाची छाप पाडणाऱ्या यशस्वी महिलांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये गोदावरी अर्बनच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांना बेस्ट चेअरमन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

भीमथडी जत्रेच्या संयोजिका सुनंदाताई पवार यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला .आपल्या कार्यकुशलतेने गोदावरी अर्बनमध्ये महत्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सुरेखा दवे सावंत यांना बेस्ट चिफ मॅनेजर म्हणून सन्मानित करण्यात आले.बेस्ट ज्युनिअर ऑफिसर म्हणून काम करणाऱ्या गोदावरी अर्बन दारव्हा शाखेच्या साक्षी मते यांना ,तर यवतमाळच्या बेस्ट सब-स्टाफ म्हणून सुनीता गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला आहे.
              
या पुरस्कार सोहळ्याचे वितरण सहकार भवन शिर्डी येथे करण्यात आले होते.याप्रसंगी भीमथडी जत्रेच्या संयोजिका यांच्या हस्ते राजश्री पाटील,सुरेखा दवे,साक्षी माटे सुनीता गायकवाड यांना  मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला आहे. याप्रसंगी आ.श्वेता महाले शिर्डी संस्थानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानाईत, सहकार उद्यमीच्या ऍड.अंजली पाटील, राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे,मल्टीस्टेट फेडरेशन अध्यक्ष तथा साई संस्थानचे विश्वस्त सुरेश वाबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.राज्यात सहकारी पतसंस्था चळवळी मध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर आहे.यामुळे राज्य फेडरेशने सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या सोळा हजार पेक्षा अधिक संस्थाच्या कामाचा व त्यात आपले कर्तृत्ववाने छाप पडणाऱ्या महिलांचा मागोवा घेण्यात आला.त्यातून या पुरस्कारांची निवड करण्यात आली आहे.
           
गोदावरी अर्बन कायमच भविष्याचे वेध  घेत काम करणारी सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्था आहे.सहकार क्षेत्रासोबतच सामाजिक काम असो की ग्राहकांना अत्याधुनिक सेवा असो यामध्ये कायमच ग्राहकांचे समाधान व हित जोपासण्यासाठी काम करीत नवनवीन यशोशिखर सर करणारी संस्था म्हणून नावारूपाला आली आहे.गोदावरी अर्बनच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांनी हा पुरस्कार संस्थापक अध्यक्ष खासदार हेमंत पाटील,व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर,समस्त संचालक मंडळ, ग्राहक व  माझ्यासोबत बचतगटातील चळवळी पासून आजतागायत काम करणाऱ्या सर्व सहकारी महिलांना समर्पित केला आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी