नांदेड| येथील सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या 'प्रज्ञांकुर' या भीमजयंती विशेषांकाचे प्रकाशन मोठ्या थाटात संपन्न झाले.
यावेळी संत बाबा बलविंदरसिंघजी, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, जयदीप कवाडे, आ. बालाजी कल्याणकर,मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, अतिरिक्त आयुक्त गिरीष कदम, प्रवीण साले, रमेश सोनाळे, भदंत पंय्याबोधी, श्रीकांत गायकवाड, पंढरीनाथ बोकारे, भीम महोत्सवाचे संयोजक बापूराव गजभारे, मुख्य संपादक मारोती कदम, सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष अनुरत्न वाघमारे, उपाध्यक्ष नागोराव डोंगरे, कोषाध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे, कार्याध्यक्ष शंकर गच्चे, जिल्हाध्यक्ष रणजित गोणारकर आदींची उपस्थिती होती.
डॉ. बी आर आंबेडकर फाउंडेशनच्या यांच्या वतीने नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या भीम महोत्सवाला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. यावेळी समता गौरव पुरस्कार पत्रकार श्रीमंत माने, कृष्णाई जिल्हा पत्रकार पुरस्कार प्रल्हाद कांबळे, छायाचित्रकार पुरस्कार ज्ञानेश्वर सुनेगावकर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. दरम्यान, सप्तरंगी साहित्य मंडळाच्या प्रज्ञांंकुर या भीमजयंती विशेषांकाचे मोठ्या थाटामाटात प्रकाशन संपन्न झाले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय गायिका गिन्नी माही यांनी आपल्या संचासह बुद्ध भीम गितांचे सादरीकरण केले.
