लोहा| शहरातील जुन्या भागात कलालपेठ मध्ये राहणार कमलाकर काशिनाथ महाबळे यांचे पुणे येथे रविवारी रात्री निधन झाले. मृत्यू समयी त्याचे वय ५१ वर्ष होते.
सोमवारी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, १ मुलगा असा परिवार आहे. भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा पर्यटन सचिव पत्रकार रत्नाकर महाबळे, व प्रभाकर महाबळे यांचे मोठे बंधू होते. शांत संयमी व मनमिळावू स्वभावाच्या कमलाकर यांच्या अकाली निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
