हदगाव, शे चांदपाशा| देशभरात पेट्रोल डिझेल घरगुती गँस खाद्यतेल जीवन अवश्यक वस्तुच्या दरवाढी मुळे महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. जनतेची खुलेआम लूट सुरू आहे. पण केंद्रातील सरकार मात्र डोळे झाकून बसले आहे.
केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात आवाज उठवून सरकारला जागे करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीचा आदेश नुसार हदगाव विधानसक्षेञाचे आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड वाढलेल्या महागाईच्या विरोधात हदगाव तालुका कॉग्रेस कमिटीचा वतीने पदयात्रा काढून निदर्शने करण्यात आले.
यावेळी तालुका अध्यक्ष आनंदराव भंडारे, महिला तालुका अध्यक्ष सविता ताई चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष सुनिल भाऊ सोनुले, अनिल पाटील बाभळीकर, ज्ञानेश्वर माने खदीर खान शहर, जि.प.सदस्य, प स सदस्य आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
