नांदेड| युगपुरुष महात्मा ज्योतीबा फुले व विश्वभुषण, महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त लोकजागर सेवाभावी संस्था आणि पुष्पाई सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १४ एप्रिल रोजी सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
महामानव तथा युगपुरुष महात्मा ज्योतीबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी दि. 14 एप्रिल 2022 रोजी सकाळी 7.00 वाजता महानगरपालिका हायस्कूल, काब्दे हाॅस्पीटलजवळ नांदेड येथे सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना विनाशुल्क प्रवेश देण्यात येणार असून सदर परीक्षा 100 मार्काची होणार आहे.
परीक्षेत उत्तीर्ण होऊन प्रथम क्रमांक मिळवणा-या विद्यार्थ्यांस रू. 5000, द्वितीय क्रमांक मिळवणा-या विद्यार्थ्यांस रू 4000 व तृतीय क्रमांक मिळवणा-या विद्यार्थ्यांस रू 3000 बक्षीस व प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेत आपली नावे नोंदवून सहभाग घ्यावा असे आवाहन स्पर्धा परीक्षेचे संयोजक प्रा.डाॅ.भास्कर दवणे, श्री. प्रकाश चित्ते, प्रा. डाॅ.सुनिलचंद्र सोनकांबळे, प्रा.डाॅ. गंगाधर कापुरे यांनी केले आहे.