नांदेड/उमरी| सामाजिक,धार्मिक,व राष्ट्रीय सेवाकार्यात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा ह्या राज्यस्तरीय संघटनेच्या वतीने महाराष्ट्रात प्रथमच पहिले अधिवेशन २४ एप्रिल रोजी शिर्डीत होणार आहे. या अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून आंध्रप्रदेश तेलंगणा विदर्भ राज्यातील असंख्य समाज बांधव या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहे तशी माहिती महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांनी पुण्यनगरी शी बोलताना दिली आहे.
हे अधिवेशन काशी अन्नसत्रंम शिर्डीच्या भव्यदिव्य वास्तू मध्ये माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार ह्यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून उदघाटक म्हणून माजी राज्यमंत्री आमदार मदन येरावार, प्रमुख अतिथी म्हणून आमदार समिर कुन्नावार, ज्यांनी महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेला तिरुपती बालाजी येथे एक एकर जमीन भव्य वास्तू निर्माण आणि समाजकल्याणार्थ मिळवून देण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला असे राज्यसभेचे खासदार टी.जी. व्यंकटेश, काशी अन्नसत्रमचे मुख्य समन्वयक गुब्बा चंद्रशेखर, सचिव बच्चू विलास गुप्ता ,अ.भा. आर्य वैश्य महिला महासभेच्या अध्यक्षा सौ. माधुरी लक्ष्मीकांत कोले पुणे, शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे आदींच उपस्थिती राहणार आहे.
या अधिवेशनात आर्य वैश्य महासभेचे सर्व जिल्हाध्यक्ष,सचिव कोषाध्यक्ष,पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्यानी सक्रिय सहभाग घेऊन संघटन शक्ती अधिक बलशाली करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असंही आवाहन महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेने केले आहे. महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे कार्यकारणी संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण जिल्हा विदर्भात झाली असून समाज बांधवांवर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात महासभेच्या वतीने अनेक वेळा आंदोलने करण्यात आली आहेत शिवाय महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांच्या वाढदिवसानिमित्त एकाच दिवशी एकाच वेळेला संपूर्ण राज्यात महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यात भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.
या महारक्तदान शिबिरात एकूण १८२५ युनिट रक्तसंकलंन करण्यात आले. या शिबिरातील विशेष कामगिरी बजावलेल्या नांदेड ग्रामीण महासभा शाखेने एकाच दिवशी ५२० युनिट रक्त संकलन केल्याने प्रथम बक्षीस रु८१ हजार,परभणी जिल्हा महासभा शाखेने एकूण ३५० युनिट रक्तसंकलन केल्याने ६१हजार,बीड जिल्हा शाखेने २०० युनिट रक्तसंकलन केल्याने रु ४१ हजार, दुर्गम डोंगराळ भागात किनवट तालुक्यातील बोधडी ह्या छोट्याश्या ठिकाणी एकूण ५१ युनिट रक्तसंकलन केल्याने रु ३१ हजार रुपये पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.
शिर्डी येेथे होणाऱ्या या राष्ट्रीय अधिवेशनात समाजाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध कार्याचा आढावा घेण्यात येणार आहे. या अधिवेशनासाठी महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचेे सर्व सर्व पदाधिकार्यांनी उपस्थित राहावे असे, आवाहन अध्यक्ष नंदकुमार गादेवार ,सचिव गोविंदराव बिडवई, कोषाध्यक्ष सुभाष कन्नावार, राज्य संघटना प्रमुख प्रदीप कोकडवार, बांधकाम सभापती भानुदास वट्टमवार, राज्य प्रसिद्धी प्रमुख नरेंद्र येरावार, नांदेड ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार कुंचनवार आदीनी केले आहे.