मालेगाव/ नांदेड| मालेगाव ग्रामपंचायत सचिवालयातील गाळे लिलाव प्रक्रिया नियमानुसार पुन्हा करावी या साठी बेरोजगार संघर्ष समिती चे अध्यक्ष सुभाशिष कामेवार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषन करन्यात आले होते. त्या वेळी नियमानुसार गाळे लिलाव प्रक्रिया करन्याचे लेखी आश्वासन देन्यात आले होते.
अखेर 13 एप्रिल रोजी ग्रामपंचायत ने जाहीर प्रगटन काढुन 27 तारखेपर्यंत लिलावात सहभागी होण्यासाठी 20 हजार रुपये रक्कम भरण्याचे आव्हान करण्यात आले आहे. जाहीर लिलाव प्रक्रिया केल्या मुळे ग्रामपंचायत च्या आर्थिक स्थितीत बदल होणार असून गावच्या विकासासाठी सकारात्मक पाऊल असल्याने सुभाशिष कामेवार यांनी सांगितले. लिलाव प्रक्रियेत जास्तीत ज्यास्त बेरोजगार तरुणांनी सहभाग घ्यावा असे आव्हान सुभाशिष कामेवार यांनी केले आहे.