नांदेड/मुंबई| दि.०७ एप्रिल २०२२ रोजी राजभवन येथे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशियारी ह्यांच्या हस्ते संवेदना मोहिमेचे इंटरनॅशनल लाईफ सेव्हर अवॉर्ड समारंभ पार पडला. सदरील अवॉर्ड नांदेडचे डॉ. भरत जेठवाणी यांना प्राप्त झालाय.
संवेदना मोहिमे अंतर्गत 23 मार्च 2021 रोजी संपूर्ण भारत तसेच अनेक देशांमध्ये शाहिद राजगुरू,भगत सिंग व सुकदेव ह्यांच्या 90 व्या शाहिद दिना निमित 1476 रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आली होती व ह्या रक्तदान शिबिरांमध्ये 1 लाखाहून जास्त रक्त संकलित करण्यात आले. ह्या उपक्रमाची नोंद हि लंडन बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये देखील करण्यात आली.
महाराष्ट्रामध्ये संवेदना मोहिमे अंतर्गत एकूण ९७ रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आली होती व एकूण ४ हजार १५० रक्त पिशव्या संकलित करण्यात आल्या होत्या. आपल्या जिल्ह्यातून या मोहिमेत डॉ. भरत जेठवाणी यांनी सहभाग नोंदवला होता. ह्या कार्यक्रमामध्ये इंटरनॅशनल लाइफ सेव्हर अवॉर्ड प्राप्त करणारे ३५ रक्तदान शिबीर आयोजक ठरले. कोरोना काळात सगळ्यात जास्त गरज होती ती रक्ताची व संवेदना उपक्रमामुळे देशाला ह्या कठीण काळात ह्या अश्या मोहिमेमुळे मदत झाली असे मान्यवर म्हणाले.
ह्यावेळी संवेदना मोहिमेचे आयोजन करणारे नॅशनल इंटिग्रेटेड फोरम ऑफ आर्टिस्ट अँड एक्टिविस्ट चे संस्थपाक श्री प्रितपाल पनू , संवेदना मोहिमेचे महाराष्ट्रातील सहआयोजक व महाराष्ट्र अंत्रूपुनर्र चेंबर चे अध्यक्ष श्री अमेय पाटील तसेच नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष डॉ विनायक टेमबुर्लेकर व महाराष्ट्र शासनाचे जलसंपदा विभागाचे अधिकारी श्री सतीश जोंधळे उपस्तिथ होते.