पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश -NNL


नांदेड|
पोलीस उपनिरीक्षक मर्यादीत विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2021 ही परीक्षा शनिवार 16 एप्रिल 2022 रोजी नांदेड जिल्ह्यातील 5 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कळवले आहे. 

नांदेड येथील 5 विद्यालय / महाविद्यालयातील केंद्रावर सकाळी 11 ते दुपारी 12 या कालावधीत परीक्षा होणार असून त्यासाठी 1 हजार 656 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. परीक्षेचे कामकाज सुरळीत व शांततेत पार पडावे यासाठी परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरातील फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. 

त्यानुसार परीक्षेच्या दिवशी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित असलेले अधिकारी-कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच या वेळेत केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेशात नमूद केले आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण तपासणीच्या वेळेत बदल

नांदेड जिल्ह्यात वातावरणात झालेल्या बदलामुळे, उष्णतेच्या लाटेमुळे तापमानात अचानक वाढ झाली आहे. त्यापासून बचावासाठी व खबरदारीचा उपाय म्हणून प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण तपासणीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. यानुसार सर्व वाहन चालक / मालकांनी योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी अपॉईंटमेंट घेतले आहे त्यांनी त्यांचे वाहन तपासणीसाठी सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेत सादर करावेत, असे आवाहन नांदेडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी