इस्लापूर/किनवट| किनवट तालुक्यातील इस्लापुर परिसरात येणाऱ्या मौजे नंदगाव तांडा येथे घरगुती वादावरुन पोटच्या मुलाने वडीलांच्या डोक्यात लाकडी दांडके मारुन खून केला असल्याची खळबळजनक घटना रविवार १० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान घडली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नंदगाव तांडा येथील पुंडलिक विठ्ठल आडे यांना दारुचे व्यसन होते. पुंडलिक आडे दारु पिऊन घरी नेहमी त्रास देत होते. यामध्ये बहुतांशवेळा मुलांना शिवीगाळ करुन मारहाण करीत होते. पत्नीला नेहमीच शिवीगाळ करुन मारहाण करीत होते. १० एप्रिल रोजी पुंडलिक आडे हे दारु पिऊन घरी आले व पत्नीला मारहाण करीत होते. मयतचा मुलगा किशोर पुंडलिक आडे हा गेल्या चार वर्षापासून किनवट येथे शिक्षणासाठी म्हणून वास्तव्यास होता.
नुकताच तो घरी आला असता त्यांने वडीलास कशाला दारु पिऊन भांडण करतोस ? म्हणून विचारणा करत असताना पुंडलिक आडे यांनी किशोरलाही मारहाण केली. रागाच्या भरात किशोरने वडील पुंडलिकच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने वार केला. या दुर्दैवी घटनेत मुलांच्या हातून वडीलाचा खून झाला. मयताचा वडील मुलगा सुरेश पुंडलिक आडे (२२) याने इस्लापूर पोलिस ठाण्याला दिलेल्या फियीदीवरुन भाऊ किशोर पुंडलिक आडे रा.नंदगांव तांडा याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला
असुन पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले. घटनेचा अधिक तपास अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर डेडवाल हे करित आहेत.