डी. एड.बॅचमेन्ट (सन१९९९-२००१)स्नेहमेळावा विविध अविष्कारातून संपन्न
नांदेड| मित्र भेटींच्या आतुरतेने प्रतिक्षेत असलेल्या मित्रमैत्रिणींची भेट तब्बल एकविस वर्षांनंतर सोशल मिडीया वाॅटस अप,फेसबुकच्या सहाय्याने स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून जीवनातील सुख दुःखाच्या क्षणांना उजाळा देत झाली.
त्याचे झाले असे की चंद्रपूर येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या सन १९९९ ते २००१ मधील डी एड प्रशिक्षणार्थी विद्यार्थी मित्रांचा स्नेहमेळावा कार्यक्रम लोहारा येथील हाॅटेल किंगडम येथे 17 /4/2022 ला पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात कोरोना काळात स्मृतीशेष झालेला नरेंद्र शेंडे या सहकारी मित्रास सामुहिक श्रद्धांजली अर्पण करून झाली. नंतर हरहुन्नरी व्यक्तिमत्व लाभलेल्या मनिषा पुंडे, अर्चना मुदगल यांनी काव्यात्मक अविष्कारातून सर्वांचा परिचय घेवून एकमेका प्रति एकमेकास आदरतिथ्यपणे बुके देवून स्वागत करण्यात आले.
पुढे भारती हेमके, प्रकाश राठोड, अर्चना मुदगल, शंकर शेळके यांच्या हस्ते फ्रेन्डशिप केक कापण्यात येवून एकमेकास केक भरवण्यात आला.सदर मैत्रीभाव स्नेहमेळाव्यास प्रसिद्ध व्याख्याते,लेखक रमेश पवार यांनी उद्बबोदीत करून सुंदर जीवन कसे जगावे या बाबत मार्गदर्शन केले तर,सरदेश दुर्गे अरविंद नौकरकर,शंकर शेळके यांनी आपले अनुभवातीत अनमोल प्रेरक क्षण मनोगतात व्यक्त केले.
जेष्ठ मार्गदर्शक मित्र प्रति महंमद रफी बळवंत कामडी,मंजुळ आवाज लाभलेली स्मिता पाहुणे,संदेश मानकर,यानी गायण करून कार्यक्रमात रंगत आणली कार्यक्रमाचा शेवट उत्तम जेवण, फोटोसेशन, मनसोक्त गप्पा,सुख दुःखाच्या क्षणाचा भावनिक संवाद होवून एकमेकांना पुढील यशस्वी आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे नियोजन आणि संचलन प्रकाश बन्सोड यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सरदेश दुर्गे, अरविंद नौकरकर, विनायक सातपुते यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे आभार दिलीप भाऊ पडवे यांनी केले.