नांदेड। खरीप हंगामाच्या पिकाच्या नुकसानीपोटी राज्य सरकारकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना जाहीर केलेल्या अनुदानाच्या 25 टक्के रक्कम शिल्लक राहिली होती,ती अनुदानाची रक्कम नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे मार्च अखेर जिल्हा प्रशासनाने जमा करूनही जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकऱ्यांना दोन महिने उलटूनही अनुदान वाटपास सुरवात केली नाही, अनुदानाची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांना वाटप करावी अन्यथा नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडू असा इशारा पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी बँक प्रशासनास दिला आहे.
जिल्हा प्रशासनाने अनुदानाची रक्कम मार्चमध्ये नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे वर्ग केली होती परंतु शेतकऱ्यांना अद्यापही अनुदानाचा दुसरा हप्ता मिळाला नाही जिल्हा बँकेच्या ढिसाळ नियोजनामुळे अनुदानाचे पैसे मिळण्यास वर्ष-वर्ष लागत आहे, यामुळे पुढील वर्षापासून जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या हक्काच्या अनुदानाचे पैसे राष्ट्रीयकृत बँकेत वर्ग करावे जेणेकरून शेतकऱ्यांना तात्काळ पैसे मिळतील मा. जिल्हाधिकारी नांदेड यांनी लक्ष घालून शेतकऱ्यांना येत्या आठवडाभरात पैसे मिळतील याकरता पुढाकार घ्यावा अन्यथा नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विरोधात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद व शेतकर्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील शेवटी भागवत देवसरकर यांनी दिला आहे.