नांदेड जिल्ह्यातील सर्व समावेशक महिला जिल्हा सल्लागार समिती स्थापन करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला असून त्या महिला जिल्हा महानगर समितीवर अशासकीय सदस्य पदी सौ.संन्मती देशमुख यांच्यी निवड करण्यात आली आहे,या समितीत अशासकीय सदस्य म्हणून महिलांच्या कायद्याच्या संदर्भात कार्यरत पाच अशासकीय महिला कार्यकर्त्या यांच्यी तर दोन संस्थानिक महिला संघटनेच्या संस्थेच्ये दोन महिला प्रतिनिधी निवड करण्यात आली.
सात सदस्या असलेल्या समितीची निवड जिल्हाधिकारी डॉ .विपीन ईटणकर यांनी २६ एप्रिल रोजी एका नियुक्ती पत्रव्दारे केली आहे. या निवडीबद्दल अँड.सन्मंती देशमुख यांच्ये अभिनंदन होत आहे. सिडको परिसरातील शिवसेनेचे जेष्ठ शिवसैनिक तथा बालाजी मंदिर देवस्थान हडकोचे माजी अध्यक्ष माणिकराव देशमुख यांच्या त्या कन्या आहेत.