शिवाजीराव वाघ यांची सांगली जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी निवड -NNL


नांदेड|
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे सरव्यवस्थापक शिवाजीराव वाघ यांची सांगली जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी निवड झाली आहे. 

नांदेड तालुक्यातील नाळेश्वर चे सुपुत्र असलेले शिवाजीराव वाघ हे यापूर्वी लातूर, परभणी आणि नांदेड येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. नुकतीच त्यांची सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती झाली असून ते तेथे रुजू झाले आहेत. कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक आहे.

नांदेड जिल्ह्यातील अनेकांना विविध जिल्हा बँकेत मुख्य कार्यकारी अधिकारी होण्याची संधी मिळाली आहे, त्यात राजेश्वरराव कल्याणकर हे चंद्रपूर, अजय कदम हे नांदेड,विजय घोणसे पाटील हे उस्मानाबाद, अरविंद शिंदे हे बीड जिल्हा बँकेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आणि अरुण कदम हे नासिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासक म्हणून कार्यरत आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी